लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
नगर तालुक्यातील बुरुडगाव येथील जाधव मळा येथे
जाणाऱ्या पुलाच्या कामाचे भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी सरपंच
बापुसाहेब कुलट, अरुण शिंदे, बबलू शेख, जालिंदर कुलट, प्रदीप बरबडे, शिवाजी राऊत, बाळासाहेब जाधव, मंगेश झिने, खंडू काळे, गणेश दंरदले, विठठल जाधव, विष्णूदास जाधव, महेश जाधव, संजय म्हस्के आदी उपस्थित होते.
यावेळी संदेश कार्ले म्हणाले की, जाधव मळा
येथे जाण्यासाठी नागरिकांना रस्त्याअभावी सीना नदी ओलांडून जावे लागत होते. नदीला
पुर आल्यावर पुलावरील मुरुम वाहून जात होता. पुलाला खड्डे पडले होते. पुर आला तर
शेतकऱ्यांची सर्वच कामे खोळबंत होती. रस्त्याअभावी मुलांना शाळेत जाता येत नव्हते.
या पुलासाठी बऱ्याच दिवसापासून नागरिकांचा पाठपुरावा
सुरु होता. जिल्हा परीषदेमध्ये वारंवार पाठपुरावा केल्यामुळे या रस्त्याचा प्रश्न
मार्गी लागल्याचे संदेश कार्ले यांनी सांगितले. या पुलामुळे जाधव वस्तीमधील
नागरिकांच्या दळणवळणाचा प्रश्न कायमस्वरुपी मार्गी लागला याचे समाधान असल्याचे त्यांनी
संगितले .
0 टिप्पण्या