Ticker

6/Breaking/ticker-posts

नेवासा येथे आषाढी वद्य एकादशीला ज्ञानेश्वर माऊलींचा होणारा यात्रा उत्सव रद्द

 *मंदिर संस्थान व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत झाला एकमुखी निर्णय









लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

नेवासा: आषाढी वद्य एकादशीला माऊलींची कर्मभूमी असलेल्या श्री क्षेत्र नेवासा येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात होणारा यात्रा उत्सव रद्द यंदा कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आला असल्याचा निर्णय विश्वस्त मंडळ व प्रशासकीय अधिकारी यांच्या झालेल्या बैठकीत घेण्यात आला. यामुळे यावर्षीही आषाढी वद्य वारी वारकऱ्यांच्या विनाच होणार आहे.

आषाढी वद्य एकादशी ही माऊलींचे एकादशी म्हणून मानली जाते दरवर्षी येथे या एकादशीला लाखो भाविक गर्दी करतात मात्र कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून या बैठकीचे आयोजन शुक्रवारी दि.३० जुलै रोजी संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर प्रांगणातील सभागृहात करण्यात आले होते.

संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर देवस्थानचे प्रमुख मार्गदर्शक ह.भ.प. शिवाजी महाराज देशमुख हे झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते तर संत ज्ञानेश्वर महाराज मंदीर विश्वस्त मंडळाचे माजी अध्यक्ष अँड. माधवराव दरंदले,नवनिर्वाचित अध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग,विश्वस्त विश्वासमामा गडाख,ज्ञानेश्वर माऊली शिंदे,रामभाऊ जगताप,भिकाजी जंगले, पोलीस निरीक्षक विजय करे,नायब तहसीलदार राजेंद्र गायकवाड,नगरपंचायतचे नगराध्यक्ष सतीष पिंपळे, उपनगराध्यक्ष लक्ष्मणराव जगतापआसिफ पठाण, प्रशासकीय अधिकारी रविंद्र गुप्ता,विश्वस्त कृष्णाभाऊ पिसोटे,कैलास जाधव,सोनई येथील गजानन दरंदले,माजी जिल्हा परिषद सदस्य महंमद आतार, शिवा राजगिरे,जालिंदर गवळी,भैय्या कावरे,संदीप आढाव,भाऊराव सोमुसे यावेळी उपस्थित होते.

दर बैठकीच्या प्रसंगी संत ज्ञानेश्वर महाराज भक्त मंडळाच्या वतीने  सुधीर चव्हाण यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले व दरवर्षी होणाऱ्या आषाढी वारी व यात्रा उत्सव याबद्दल माहिती दिली.संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदी माजी आमदार पांडुरंग अभंग यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा नगरपंचायत व गावकऱ्यांच्या वतीने सतीश पिंपळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलतांना  विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष  अभंग म्हणाले की सद्या कोरोनाच्या महामारी गेली नाही भीती कायम आहे,यातच तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त करण्यात येत आहे.गर्दीच्या ठिकाणी यात्रा उत्सव सोहळे सद्या रद्द असल्याने आषाढी वद्य वारीला गर्दी होऊ नये म्हणून व भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने यंदाचा संत ज्ञानेश्वरमहाराज मंदिर प्रांगणात होणारा यात्रा उत्सव रद्द करण्याचा निर्णय सर्व विश्वस्तांच्या संमतीने रद्द करण्यात येत असल्याचे सांगितले.

यावेळी बोलताना हभप शिवाजी महाराज देशमुख म्हणाले की शासन नियमांचे पालन गेल्या दोन वर्षांपासून मंदिर संस्थानच्या विश्वस्त मंडळाने आतापर्यंत केले आहे मागील वर्षीही यात्रा उत्सव व इतर होणारे धार्मिक कार्यक्रम खबरदारीचा उपाय म्हणून रद्द केले होते. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर रिस्क नको त्यातच भक्तांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शासन आदेशाचे पालन म्हणून 

यावर्षी आषाढी वद्य वारीचा उत्सव रद्द करत असून या एकादशीला कोणीही माऊलींच्या दर्शनासाठी येऊ नये दिंड्या देखील आणू नये तर घरी राहूनच माऊलींच्या प्रतिमेचे पूजन करून उपासनेच्या माध्यमातून घरच्या घरी साजरी करावी असे आवाहन केले.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या