Ticker

6/Breaking/ticker-posts

बिबट्ट्याच्या हल्ल्यात पाच शेळ्यांचा फडशा ! दहशतीने शेतकऱ्यांची घाबरगुंडी !

 








 लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)


नेवासा
: तालूक्यातील बहिरवाडी,धामोरी शिवारात बिबट्याने धुमाकूळ घालत दोन दिवसात पाच शेळ्यांचा फडशा पाडला आहे.बिबट्ट्याच्या दहशतीने परिसरातील शेतकऱ्यांची चांगलीच पाचावरधारण बसली आहे.

अहमदनगरचे वनपरिक्षेञ अधिकारी सुनिल थिटे यांना घटनेची माहीती समजताच  तातडीने त्यांनी बहिरवाडी, धामोरी परिसरात वनविभागाचे पथक पाठवून घटनास्थळाचा पंचनामा करुन बिबट्ट्याचा माग शोधून पिंजरा लावण्याचे आदेश वनपाल देविदास पातारे व वनरक्षक एम.आय.सय्यद यांना दिले आहेत. तालूक्यातील बहिरवाडी येथील कचरु गोविंद वाखुरे,बाळासाहेब रामकृष्ण शिंदे यांच्या वस्तीवर बिबट्याने झडप घालून प्रत्येकी एका शेळीचा फडशा पाडला. संजय हेलवडे यांच्या दोन तर धामोरी येथील भाऊराव ठोकळ यांची  एक शेळी ठार केली.

दोन दिवसांत पाच शेळ्या गिळंकृत केल्याने वाड्यावस्त्यांवर राहणाऱ्या शेतकऱ्यांची बिबट्याच्या दहशतीमुळे घाबरगुंडी उडाली आहे. अहमदनरचे वनपरिक्षेञ अधिकारी सुनिल थिटे यांच्या मार्गदर्शनाखाली नेवासा वनविभागाचे वनपाल देविदास पातारे,वनरक्षक एम.आय.पठाण,वन कर्मचारी भिमराज पाठक,सुभाष विधाटे यांनी काल शुक्रवारी  घटनास्थळाची पाहणी करुन मृत्त शेळ्यांचा पंचनामा केला  तसेच  बिबट्ट्याचा  शोध घेत बहिरवाडी शिवारात पिंजरा लावण्यात आला असून लवकरच बिबट्याला जेरबंद करण्यात येईल असे वनरक्षक सय्यद यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या