Ticker

6/Breaking/ticker-posts

मराठी भाषेसाठी काँग्रेसचा आग्रह ; देशमुखांच्या मागणीची मंत्री देशमुखानी घेतली तातडीनं दखल

 









लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 अहमदनगर: राज्यातील जिल्ह्यांच्या निर्देशिका अद्ययावत करून त्या मराठीतून प्रकाशित कराव्यात अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस विनायक देशमुख यांनी नुकतीच केली. याची सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी तातडीने दखल घेत संबंधित विभागाला यासंबंधीची कार्यवाही सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामुळे प्रशासन, नागरिक आणि स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची सोय होणार आहे.

देशमुख यांनी या विषयावर मुंबईत मंत्री देशमुख यांची भेट घेतली. देशमुख यांनी सांगितले की, ब्रिटीश राजवटीत १८८४ मध्ये सर्व जिल्ह्यांचे गॅझेटीअस तयार करण्यात आले होते. त्यानंतर वेळोवेळी ते अद्ययावत करण्यात आले. तथापि मागील ४० ते ५० वर्षांत ते अद्ययावत करण्यात आले नाहीत. ऐतिहासिक व धार्मिक अशा अहमदनगर जिल्ह्याचे गॅझेटीअर सन १९७६ मध्ये अद्ययावत केले होते. त्यानंतर मागील ४६ वर्षांत गॅझेटीअर अद्यावत करण्यात आले नाही. राज्यातील स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी, संशोधक सामाजिक, इतिहासकार, प्रशासनातील अधिकारी यांच्यासाठी गॅझेटीअर हा महत्वाचा ऐवज असतो. शिवाय मराठी भाषेचा अभिमान आणि गौरव म्हणून हे गझेटीअर्स मराठी भाषेत उपलब्ध असणे आवश्यक आहे. 

राज्यातील लातूर, सातारा, रायगड, परभणी, वर्धा, नांदेड या काही जिल्ह्यांचे गॅझेटीअर्स मराठी भाषेत उपलब्ध आहेत. अन्य जिल्ह्यांचे गॅझेटीअर्स मराठीत उपलब्ध नसल्याने ग्रामीण भागातील लोक या महत्त्वपूर्ण माहितीपासून वंचित रहात आहेत. त्यामुळे अहमदनगरसह उरलेल्या जिल्ह्यांचे गॅझेटीअर्स मराठीत उपलब्ध करून द्यावेत, तसेच ते अद्ययावतही करावेत, अशी मागणी देशमुख यांनी केली. मंत्री देशमुख यांनी हा प्रश्न समजावून घेतला. त्यानंतर त्याला सकारात्मक प्रतिसाद देत लगेचच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना कार्यवाही सुरू करण्याच्या सूचना दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या