लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
अहमदनगर: शहरांमध्ये अमृत भुयारी गटार योजनेचे काम
पावसाळा संपेपर्यंत थांबविण्याच्या सूचना उपमहापौर गणेश भोसले यांनी आयुक्त शंकर
गोरे यांना दिल्या असता आज याची दखल घेत मध्यवर्ती शहरांमध्ये ज्या-ज्या ठिकाणी
अमृत भुयारी गटार योजनेसाठी खोदकाम केले आहे त्या-त्या ठिकाणी खड्डे बुजवणे व
पॅचिगंचे काम सुरु केले आहेत.
शहरांमध्ये केंद्र शासनाची अमृत भुयारी गटार योजनेचे काम गेल्या अनेक वर्षांपासून संथगतीने सुरू आहे. मध्यवर्ती शहरामध्ये विविध ठिकाणी पाईप टाकण्यासाठी खोदकाम झाले आहे .त्यामुळे खोदकाम झाल्यानंतर ती माती रस्त्यावर टाकली जाते पावसाच्या पाण्यामुळे चिखल होऊन रस्त्यावर छोटेमोठे अपघात होतात नागरिकांना वाहने चालवताना मोठी कसरत करावी लागते.
0 टिप्पण्या