लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
घटनास्थळाची पाहणी झाल्यानंतर पथक गावात
गेले. तेथेही शुकशुकाट होता. ग्रामपंचायत कार्यालयात एक शिपाई होता. तेथे एक
रजिस्टर आढळून आले. त्यामध्ये शर्यतीत भाग घेतलेल्या लोकांची नावे, हिशोब असा मजकूर होता. याशिवाय त्या
शिपायाच्या मोबाईलमध्ये शर्यतीचे व्हिडिओ आणि फोटो होते. ते सर्व ताब्यात घेण्यात
आले. त्या आधारे संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले. तहसीलदार देवरे यांच्यासह
पोलीस उपनिरीक्षक विनायकुमार बोत्रे यांच्या पथकाने ही करवाई केली. ग्रामविकास
अधिकारी मीना जनार्दन काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शर्यत आयोजित करणारे गुंडा
भोसले, संभाजी नरसाळे, संतोष शिणारे,
संतोष गुंजाळ, दत्ता ताठे (रा. शिरापूर ता.
पारनेर), अर्जुन लामखडे, रुपेश लामखडे
(रा. निघोज ता. पारनेर) यांच्यासह अन्य लोकांविरोधात विरोधात गुन्हा दाखल करण्यात
आला आहे. ग्रामपंचायतीत आढळलेल्या रजिष्टरमध्ये ५६ लोकांची नावे आहेत. त्यांनी
यामध्ये सहभाग घेतल्याचे दिसून येत असल्याने त्यांचीही चौकशी करण्यात येणार
असल्याचे सांगण्यात आले.
0 टिप्पण्या