*कोकणामधील
पूरग्रस्तांना आ.संग्राम जगताप यांचा मदतीचा हात
*जीवनावश्यक
वस्तूंचा ट्रक कोकणकडे केला रवाना
लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
अहमदनगर
: महाराष्ट्रावर जेव्हा-जेव्हा
संकट येतात तेव्हा-तेव्हा नगर जिल्ह्याने सदैव मदतीचा हात दिला आहे. कोकणामध्ये
अतिवृष्टी झाल्याने महाप्रलय आल्यामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. यामध्ये
काहींचा दुर्दैवी मृत्यूही झाला आहे, पुरग्रस्तांना मदतीचा हात देणे हे आपले कर्तव्य
समजून नगरकरानी पुढे यावे, असे आवाहन शहराचे आमदार संग्राम
जगताप यानी केले आहे.
अहमदनगर
जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने २ हजार कुटुंबीयांतपर्यंत मदत
पोहोचविण्याचे काम केले. यासाठी संसार उपयोगी वस्तू कपडे,आरोग्याच्या दृष्टीने आरोग्यदायी
वस्तू तसेच महिलांसाठी कपडे,ब्लॅंकेट आदींसह विविध
जीवनावश्यक वस्तूंचा ट्रक कोकणामध्ये पाठवण्यात आले.
महापुरातील नुकसानग्रस्त
भागातील नागरिकांना संसारोपयोगी
वस्तूंच्या रूपाने मदतीचा हात देताना आ. अरुण काका जगताप,आ.संग्राम
जगताप,स्थायी समिती सभापती अविनाश घुले,नगरसेवक प्रकाश भागानगरे,प्रा.माणिकराव विधाते,सुमतीलाल कोठारी,अशोक पितळे, कमलेश
भांडरी,दीपक सुळ, संभाजी पवार,विजय गव्हाळे, संजय झिंझे,वैभव
वाघ,संतोष लांडे, उबेद शेख,समद खान,सारंग पंधाडे, विनित
पाऊलबुधे,अमोल गाडे,अंजली आव्हाड,सुनील त्रंबके,प्रा.अरविंद शिंदे,संजय ताठेड,लंकी खुपचंदानी, सुरेश
बनसोडे,राजेश कातोरे,सोनू घेमुड,वैभव ढाकणे,माऊली जाधव आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना आ.संग्राम जगताप
पुढे म्हणाले की,गेल्या दीड वर्षापासून नागरिक कोरोनाच्या
संकटाला तोंड देत असताना नगर शहरातील गरजू कुटुंबाना अन्नधान्यांचे वाटप केले
आहे.त्याच पद्धतीने सकारात्मक दृष्टिकोनातून सामाजिक बांधिलकी जोपासत कोकणातील
पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे.
मागील वर्षीही कोल्हापूर वासियांना नगर शहरातील
नागरिकांनी मोठ्या प्रमाणात मदत केली होती.यावर्षीही कोल्हापूर, सांगली भागातील पूरग्रस्तांना येत्या दोन दिवसात पुन्हा मदत केली जाणार
आहे.आपण सर्वजण सहलीसाठी कोकणामध्ये जात असतो,ही सामाजिक
बांधिलकी जोपासत सर्वांनी पुढे यावे व मोठ्या प्रमाणात मदतीचे हात द्यावे असे ते
म्हणाले.
0 टिप्पण्या