माजी मुख्यमंत्री स्व.वसंतराव नाईक यांना जयंतीनिमित्त अभिवादन
लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
पाथर्डी: कै . वसंतराव नाईक यांनी दीर्घ काळ मुख्यमंत्री म्हणून जे काम केले ते खरोखरच आजही राज्याला भूषणावह असून त्यांच्याच काळात महाराष्ट्राच्या विकासाचा पाय रचला गेला त्यांचे योगदान सदैव स्मरणात राहील , असे प्रतिपादन शिवसेना तालुका प्रमुख अंकुश चितळे यांनी केले.
राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व . वसंतराव नाईक यांच्या जयतीनिमित्त आज पाथर्डी येथे तालुका शिवसेना व गोर सेनेच्या वतीने नाईक चौकातील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी चितळे बोलत होते.
यावेळी गोर सेनेचे नेते संजय पवार ,दीपक पवार तसेच शिवसेनेचे आणि गोर बंजारा सेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
0 टिप्पण्या