Ticker

6/Breaking/ticker-posts

कर्जत मधील धाकटी पंढरी , गोदड महाराजांची रथ यात्रा रद्द

 









लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 कर्जत : धाकटीपंढरी अशी ओळख असलेल्या कर्जत येथील ग्रामदैवत सद्गुरु गोदड महाराज यांची रथयात्रा कोरोनामुळे यावर्षी देखील रद्द करण्यात आली आहे तसा महत्वपूर्ण निर्णय शांतता कमिटीच्या झालेल्या बैठकीमध्ये घेण्यात आला.

 आमदार रोहित पवार यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये पंचायत समितीच्या सभागृहांमध्ये कर्जत येथील ग्रामदैवत गोदड महाराज यांची कामिका एकादशी या दिवशी सालाबाद प्रमाणे भरत असलेली रथयात्रे बाबर नेमकी काय भूमिका घ्यायची यासाठी शांतता कमिटीची खास बैठक बोलविण्यात आली यावेळी तहसीलदार नानासाहेब आगळे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव प्रभारी गटविकास अधिकारी रूपचंद जगताप प्रमुख मानकरी मेघनाथ पाटील , आबा पाटील प्रथम नगराध्यक्ष नामदेव राऊत काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण घुले बप्पासाहेब धांडे काकासाहेब धांडे मंदिराचे पुजारी पंढरीनाथ काकडे अनिल काकडे सुनील शेलार अमृत काळदाते अनिल गदादे सचिन सोनमाळी यांच्यासह राजकीय सामाजिक धार्मिक क्षेत्रातील सर्व प्रमुख त्याचप्रमाणे मंदिराचे पुजारी विश्वस्त मानकरी व ग्रामस्थ या वेळी उपस्थित होते.

 यावेळी बोलताना तहसीलदार नानासाहेब आगळे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी कोरोनाविषाणू चा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्हाधिकारी यांची असलेल्या आदेश याबाबत माहिती देताना सांगितले की कोणतीही यात्रा उत्सव भरण्यास परवानगी देण्यात आलेली नाही शिवाय सर्व मंदिरे बंद आहेत त्यामुळे कर्जत येथे सालाबाद प्रमाणे भरविण्यात येणारी रथयात्रा यावर्षी भरता येणार नाही अशी माहिती बैठकीमध्ये दिली याचप्रमाणे अजूनही रोज रुग्ण वाढत असून सर्व अस्थपणा लवकर बंद करण्यात येत आहेत त्याचप्रमाणे शनिवार-रविवार सर्व व्यवहार बंद  शासनाच्या आदेशानुसार बंद ठेवण्यात आले आहेत अशी माहिती दिली.

 यावेळी आमदार रोहित पवार यांनी उपस्थित सर्वांसोबत या बाबत चर्चा केली व अखेर शासनाची कोणतीही परवानगी नसल्यामुळे ही रथयात्रा यावर्षी रद्द करण्यात आली आहे असे जाहीर करण्यात आले यावेळी कोणतीही दुकाने किंवा अन्य कोणतेही व्यवहार चालू राहणार नाही असेदखील प्रशासनाच्या वतीने जाहीर करण्यात आले. यामुळे धाकटीपढरी अशी ओळख असलेल्या कर्जत येथील गोदड महाराज यांची रथयात्रा कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी रद्द करण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या