लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
नवी दिल्लीः केंद्रीय मंत्रिमंडळाचा
विस्तार आणि खातेवाटपात बुधवारी झाले. यानंतर पंतप्रधान मोदींनी आज नव्या
मंत्रिमंडळासोबत पहिली बैठक घेतली. काही मंत्र्यांना हटवण्यात आल्यावर पंतप्रधान
मोदींनी या बैठकीत स्पष्टीकरण दिलं. व्यवस्थेमुळे मंत्र्यांना हटवण्यात आलं. याचा
संबंध त्यांच्या क्षमतेशी जोडू नये. नव्या मंत्र्यांनी त्यांच्या अनुभवाचा फायदा
घ्यावा, असं पंतप्रधान मोदींनी सांगितलं.
माध्यमांमध्ये
विनाकारण शेरबाजी करण्यापासून दूर राहण्याचा सल्लाही पंतप्रधान मोदींनी नव्या
मंत्र्यांना दिला. आपला चेहरा चमकवण्याऐवजी मंत्र्यांनी चमकदार कामगिरी केली
पाहिजे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
संसदेच्या येत्या पावसाळी अधिवेशनासाठी मंत्र्यांनी पूर्ण तयारीनिशी यावं. यासोबतच
सर्व मंत्र्यांनी सकाळी ९.३० वाजता मंत्रालयात येण्याचा सल्लाही दिला.
पंतप्रधान मोदींनी बैठकीत देशातील
करोनाच्या स्थितीचा उल्लेख केला. देशातील पर्यटन स्थळांवर मोठ्या प्रमाणात गर्दी
होत आहे. करोनासंबंधी नियमांचं आणि मार्गदर्शक सूचनांचं उल्लंघन होत आहे. तसंच
महाराष्ट्र आणि केरळमधील मोठ्या रुग्णसंख्येवरूनही पंतप्रधान मोदींनी बैठकीत चिंता
व्यक्त केली. करोनाच्या नवीन रुग्णांची संख्या कमी झाल्याने नागरिक आता घराबाहेर
पडत आहेत. पण करोना महामारीचा धोका अजूनही टळलेला नाही. छोटासा निष्काळजीपणाही
सर्वांसाठी एक संकट बनू शकते. यामुळे नागरिकांनी करोनाचे नियम पाळले पाहिजे, असं सूत्रांनी सांगितलं.
0 टिप्पण्या