Ticker

6/Breaking/ticker-posts

‘अरारारा... १०० टक्के नाचायला येणार’, प्रवीण तरडेचा मनसेला पाठिंबा

 







लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 मुंबई : गेल्या दीड वर्षांपासून करोनाचं संकट आणि ते आटोक्यात आणण्यासाठी आधी लॉकडाऊन आणि त्यानंतर दैनंदिन गोष्टींवर कमालीचे निर्बंध लावण्यात आले. या करोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून सार्वजनिक कार्यक्रम आणि सण- उत्सव साजरे करण्यावरही कठोर निर्बंध घातले आहेत. परंतु यावर्षी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कोणत्याही परिस्थितीमध्ये दहीहंडी सार्वजनिक स्वरुपात मोठ्या उत्साहात साजरा करण्याचे जाहीर केले आहे.

 मनसेच्या या भूमिकेमुळे पुन्हा दहीहंडीवरून ऐन श्रावण महिन्यात राजकीय धुळवड रंगण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. तर दुसरीकडे लेखक-दिग्दर्शक आणि अभिनेते गेल्या दीड वर्षापासून देशातील नागरिक करोनाला सामोरे जात आहेत. या करोनामुळे गेल्या वर्षी जवळपास सगळेच उत्सव रद्द करण्यात आले तर काही उत्सव हे मोजक्या लोकांच्या उपस्थितीत आणि सोशल डिस्टन्सिंग राखत साजरे करावे लागले होते. आता करोना व्हॅक्सिनेशन राज्यात सगळीकडे सुरू झाले आहे. अनेकांनी करोना व्हॅक्सिन घेतले आहे, त्यामुळे आता मनसेने आगामी दहीहंडीचा उत्सव मोठ्या जल्लोषात आणि अतिशय भव्य प्रमाणात साजरा करण्याचा निर्धार केला आहे.

 मनसेचे नेते अभिजीत पानसे यांनी त्यांच्या फेसबुकवर ३१ ऑगस्ट रोजी विश्वविक्रमी दहीहंडी साजरी करणार आहे, अशी पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये पानसे यांनी मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांचेही नाव नमूद केले आहे. तसेच 'करोना लसीचे दोन्ही डोस घेऊन दहीहंडी उत्सवात सहभागी होण्यासाठी एकत्र या आणि आपला मराठी उत्सव साजरा करा', असे आवाहन अभिजीत पानसे यांनी केले आहे. करोनाचे सर्व नियम पाळून मनसेकडून ही दहीहंडी साजरी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यात म्हटले आहे.


अभिजीत पानसे यांच्या या फेसबुक पोस्टवर मनसेच्या समर्थकांनी भरभरून प्रतिक्रिया आणि कमेन्ट करायला सुरुवात केली आहे. यामध्ये अभिनेता व दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी देखील मनसेच्या या दहीहंडीच्या उपक्रमाला जाहीर पाठिंबा दिला आहे. इतकेच नाहीतर '१०० टक्के नाचायला येणार' अशी कमेन्टही प्रवीण तरडे यांनी या पोस्टवर केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या