लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
ते म्हणाले 'पंकजा मुंडे किंवा प्रीतम मुंडे नाराज
नाहीत, त्यांचे कार्यकर्ते नाराज आहेत. कोणत्याही नेत्याबद्दल कार्यकर्त्याच्या मनात
आत्मीयता असते. त्यामुळे आपल्या नेत्यासाठी त्यांना पक्षाकडून अपेक्षा असणे सहाजिक
आहे. मात्र, भाजपमध्ये पंतप्रधान मोदींचा निर्णय म्हणजे फायनल, त्यांनी घेतलेला निर्णय
अंतिम मानला जातो. त्यामध्ये नंतर बदल होत नाही. पक्ष प्रत्येकालाच खूष करू शकत
नाही. याचा विचार कार्यकर्त्यांनीही केला पाहिजे,' असे सुजय
विखे म्हणाले.
'माझ्याही कार्यकर्त्यांची अपेक्षा
होतीच. मला स्वत:ला त्याचे काहीच वाटत नाही. भाजपमध्ये मंत्री आणि खासदार यांना
समानच वागणूक मिळते. गेल्या दोन वर्षांत भरपूर कामे करता आली. आता मंत्रिमंडळातील
नव्या सदस्यांशीही आपले चांगले संबंध आहेत. त्यांचा उपयोग मतदारसंघातील कामांसाठी
होणार आहे,’ असेही ते म्हणाले.
0 टिप्पण्या