लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
पाथर्डी: तालुक्यातील करंजी येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. गणेश शेळके आत्महत्या प्रकरण ही
गंभीर बाब असून ती राजकीय गोष्ट नाही. सरकार कोणाचेही असो मात्र या प्रकरणाची कसुन
चौकशी व्हावी. जे कोणी गुन्हेगार असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, अन्यथा तीव्र अंदोलन छेडण्याचा इशारा केदारेश्वर कारखान्याचे अध्यक्ष अँड.
प्रतापराव ढाकणे यांनी दिला आहे.
याबाबत बोलताना ढाकणे म्हणाले, पाथर्डी तालुक्यात जे चालले आहे ते गंभीर आहे. डॉ.गणेश शेळके यांच्या
प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहीजे.
यामधे राजकारण करु नये मात्र जे खरे दोषी
आढळतील तो कोणीही असो त्याच्यावर गुन्हे दाखल झालेच पाहीजेत.
सरकार कोणाचे आहे किंवा इतर बाबी
महत्वाच्या नाहीत. ही घटना मनाला चटका लावणारी आहे. हे नेमके चाललय काय ?कोणाला कशाचेही काहीच वाटत नाही. चौकशी करा गु्न्हे दाखल करा अन्यथा आम्ही
रस्त्यावर उतरुन तीव्र स्वरुपाचे अंदोलन करु. अँड. प्रतापराव ढाकणे यांनी शेळके आत्महत्या प्रकरणी चौकशीची मागणी केली आहे.
0 टिप्पण्या