Ticker

6/Breaking/ticker-posts

कोल्हापूरला दिलासा! पंचगंगेचे पाणी एक फुटाने ओसरले

 







लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : कोकणसह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात आलेल्या पुरानंतर आता मदत व बचावकार्याला वेग आला आहे. जाणून घेऊन राज्यातील पुरस्थिती\..

रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, सांगली, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना पुराचा मोठा तडाखा बसला आहे. पावसानं उघडीप दिल्यानंतर व काही ठिकाणचे पाणी ओसरल्यानंतर आता मदतकार्याला वेगानं सुरू झालं आहे. दरडी कोसळलेल्या ठिकाणी बेपत्ता नागरिकांचा शोध सुरू आहे. 

महाराष्ट्रातील पूरस्थिती
*कोल्हापुरात अजूनही ११६ बंधारे पाण्याखाली

*कोल्हापूरकरांना दिलासा; पंचगंगेची पाणीपातळी १ फुटाने कमी .

*कराडमधील प्रिती संगमावरील यशवंतराव चव्हाणांचे स्मृतीस्थळाला अजूनही पाण्याचा वेढा आहे. पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक बंदच

*कोयना धरणातून ५३ हजार क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग

*खासदार संभाजीराजे भोसले यांची चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत यांच्याशी चर्चा. नौदलाच्या मदतीची केली विनंती

*पाटण तालुक्यातील आंबेघर येथे एनडीआरएफची टीम अद्यापही पोहचू शकलेली नाही. आंबेघरमध्ये दरड कोसळल्यानंतर १४ लोक बेपत्ता आहेत. काहींचा मृत्यू झाला आहे.

*सातारा जिल्ह्यात मध्यरात्रीनंतर पावसाची काहीशी उघडीप

*रत्नागिरी: चिपळूण खेर्डी येथील सती समर्थनगर येथील पूरग्रस्त कुटुंबांना माजी खासदार निलेश राणे यांच्याकडून चटई, ब्लॅंकेट व जीवनावश्यक वस्तूंची मदत.

*एनडीआरएफची टीम व पॅरा मेडिकल मिल्ट्री टीम, खेड येथील मदत ग्रुपचे कार्यकर्ते मदतीसाठी खेडमध्ये पोहोचले. सकाळपासून मदतकार्य पुन्हा सुरू.

*खेड तालुक्यातील बिरमणी येथे एक तर पोसरे येथे चार जणांचे मृतदेह शुक्रवारी रात्री दरडीच्या ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले. बीरमणी येथे ७० वर्षीय जयवंत भाऊराव मोरे यांचा मृतदेह सापडला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या