Ticker

6/Breaking/ticker-posts

'..म्हणून पंकजा मुंडे चुकीचा निर्णय घेणार नाही', आरक्षणासाठी शरद पवारांनी मार्गदर्शन केले नाही' विनायक मेटेंची खदखद..

 









लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 नांदेड : खासदार प्रीतम मुंडे यांना मंत्रीपद न मिळाल्याने त्यांच्या समर्थकांनी राजीनामे दिले. पण त्यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे राजीनामे द्यावे, ते स्वीकारले तरी जातील अशी प्रतिक्रिया देत आमदार विनायक मेटे यांनी राजीनामा सत्र नाट्य असल्याचे अप्रत्यक्षपणे सांगितले. इतकंच नाहीतर पंकजा मुंडे काही चुकीचा निर्णय घेणार नाही असंही विनायक मेटे यांनी म्हटलं आहे.


विनायक मुंडे म्हणाले की, 'भाजपाने मुंडे कुटुंबाला खूप काही दिले. याची जाणीव पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांनापण आहे. त्यामुळे पंकजा मुंडे काही चुकीचा निर्णय घेतील असं वाटतं नसल्याचे' आमदार मेटे म्हणाले आहे.

'मराठा आरक्षणासाठी शरद पवारांनी राज्य सरकारला मार्गदर्शन केले नाही'

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मराठा समाजाच्या प्रश्नाबद्दल राज्य सरकारला मार्गदर्शन केलं नाही. हे मराठा समाजाचे दुर्देव असल्याची टीका आमदार विनायक मेटे यांनी केली आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याची त्यांची इच्छा आहे की नाही मला माहित नाही. पण सरकार ज्या पद्धतीने वागत आहे. त्यावरून असं वाटतं की मराठा समाजाला आरक्षण देण्याची सरकारची भूमिका नाही असं देखील मेटे म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या