Ticker

6/Breaking/ticker-posts

चाळीस हजारांची लाच घेताना वन अधिकारी चतुर्भुज

 






लोकनेता  न्यूज

(  ऑनलाईन न्यूज नेटवर्क  )

संगमनेर:  तालुक्यातील उपविभागीय वन अधिकाऱ्याला आळेफाटा (ता. जुन्नर) चौकात ४० हजारांची लाच घेताना नगरच्या लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले आहे. विशाल किसन बोराडे (वय ४० ) असे संबंधित अधिकाऱ्याचे नाव असून मूळचा आंबेगाव तालुक्यातील रहिवाशी आहे.


याबाबत सविस्तर माहिती अशी की, आळेफाटा येथील तक्रारदार याचा मावसभाऊ यांची संगमनेर तालुक्यातील डोळासणे येथील पुर्वी वनक्षेत्रात येत असलेली शेतजमीन ही निर्वनीकरण झाले असले बाबतचा अभिप्राय देऊन जिल्हाधिकारी अहमदनगर यांना अहवाल पाठविणे करिता यातील आरोपी लोकसेवक यांनी तक्रारदार यांचेकडे ४० हजारांची मागणी केली होती.

तक्रादाराने दोन दिवसापूर्वी नाशिक दौऱ्यावर असलेल्या वनराज्यमंत्री दत्तामामा भरणे याना याबाबत तक्रार केल्यानंतर त्यांनी संबंधित अधिकाऱ्याला तात्काळ अभिप्राय देणायच्या सूचना केल्या होत्या. मात्र अधिकाऱ्याने लाचेची मागणी कायम ठेवल्याने तक्रारदार यांनी अहमदनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिलेनंतर आरोपी लोकसेवक विशाल बोराडे यांनी तक्रारदार यांचेकडे आपल्या मूळगावी आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव येथे जाताना आळेफाटा पैसे येथे स्विकारण्याचे मान्य केले.

आळेफाटा चौकात आयोजित लाचेच्या सापळा कारवाई दरम्यान पंचासमक्ष ४० हजार रुपये स्विकरली असता त्यांना रंगेहाथ पकडले. संगमनेर शहर पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या