Ticker

6/Breaking/ticker-posts

‘‘ मॉ तेरी कसम..!’’ लष्कराची शहीदांना श्रद्धांजली..!



 




लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 नवी दिल्ली : येत्या 26 जुलैला कारगिलच्या ' विजय दिन 'ला 22 वर्षे पूर्ण होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर लष्कराने शहीदांना श्रद्धांजली देताना, त्यांच्या बहादुरीला सलामी करताना एक गाणं समर्पित केलं आहे. या गाण्याच्या माध्यमातून लष्कराने 1999 साली झालेल्या कारगिल युद्धातील आपल्या हिरोंचे स्मरण केलं आहे. 


कारगिल युद्ध ही भारताच्या इतिहातील एक महत्वाची घटना आहे. या युद्धात भारताने पाकिस्तानला चारी मुंड्या चित केलं आणि विजय मिळवला. कारगिल युद्धात भारताने मिळवलेला विजय ही पाकिस्तानची भळभळती जखम आहे. भारताने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाचे स्मरण म्हणून 26 जुलैला कारगिल  विजय दिवस साजरा केला जातो. 

 

भारतीय लष्कराच्या नॉर्थन कमांडने या कारगिल विजय दिवसाबद्दल एक गाणं तयार केलं आहे. या गाण्याचे गायन हे गिरिक अमन या गायकाने केलं आहे. लष्कराच्या नॉर्थन कमांडने हे गाणं सोशल मीडियावर शेअर केलं आहे. 


 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या