*महिला
काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची गोवऱ्यासह जिल्हाधिकारी कार्यलयासमोर निदर्शने
लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
अहमदनगर :इंधन दरवाढीचा निषेध करीत महिला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी हातात गोवऱ्या घेऊन जिल्हाधिकारी कार्यलयासमोर निदर्शने केली. त्यानंतर या गोवऱ्या निवेदनासोबत कुरिअरद्वारे दिल्लीला पंतप्रधानांच्या पत्यावर पाठविण्यात आल्या आहेत.
अहमदनगर
शहर जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीने शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे
यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. गॅस दरवाढ कमी करण्याच्या मागणीसाठी
केंद्र सरकारचा निषेध म्हणून शेणाच्या गोवऱ्या कुरिअरने पाठविण्यात आल्या. निवासी
उपजिल्हाधिकारी यांनाही मागण्यांचे निवेदन देण्यात आले. इंधन दरवाढीच्या विरोधात
सध्या काँग्रेसतर्फे विविध आंदोलने सुरू आहेत. अहमदनगरमध्ये सायकल रॅलीनंतर आज
गोवऱ्या पाठविण्याचे आंदोलन करण्यात आले.
२०१४
च्या निवडणूक प्रचारादरम्यान प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करण्याचे
आश्वासन भाजपकडून देण्यात आले होते. मोदी सरकार सत्तेत येऊन जवळपास सात वर्षे
उलटली तरी देखील आमच्या खात्यावर पंधरा लाख रुपये जमा झालेले नाहीत. तेवढे तात्काळ
पाठवून द्यावेत, असेही निवेदनात म्हटले आहे.
0 टिप्पण्या