Ticker

6/Breaking/ticker-posts

लसीचे दोन डोस घेतलेल्यांना लॉकडाउनमधून सूट ? अजित पवार मुख्यमंत्र्यांशी बोलणार

 *करोना निर्बंध काही प्रमाणात उठवण्याबाबत विचार सुरू

*लसीचे दोन डोस घेतलेल्यांना दिलासा मिळण्याची शक्यता

*अजित पवार करणार मुख्यमंत्र्यांशी चर्चा




 




लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 पुणे: करोनाची दुसरी लाट ओसरली असल्यानं आता संपूर्ण लॉकडाउन कधी उठणार याकडं राज्यातील नागरिकांचं लक्ष लागलं आहे. मात्र, तिसऱ्या लाटेच्या संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार तडकाफडकी कुठलीही मोकळीक देण्यास तयार नाही. त्यामुळं लॉकडाउन उठवण्याचे वेगवेगळे पर्याय पुढं येऊ लागले आहेत. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार  यांनी आज याच संदर्भात महत्त्वाची माहिती दिली.

पुण्यातील पिंपरी चिंचवड येथे ते पत्रकारांशी बोलत होते. कोरोंना लॉकडाउनला आता जनता पुरती कंटाळली आहे. अनेक ठिकाणी मुक्तपणे वावरता येत नाही. मुंबईसारख्या ठिकाणी लोकल बंद असल्यानं हजारो लोकांच्या रोजगारावर विपरीत परिणाम झाला आहे. छोट्या उद्योगधंदेही ठप्प आहेत. शाळा बंद असल्यानं विद्यार्थ्यांचंही मोठं नुकसान होत आहे. लसीकरण सुरू झाल्यानंतर लॉकडाउन हळूहळू उठेल, अशी आशा होती. मात्र, तीही फोल ठरली आहे. तिसऱ्या लाटेचा धोका असल्यानं सरकारनं पूर्ण लॉकडाउन उठवणं टाळलं आहे.


या पार्श्वभूमीवर अजित पवारांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, 'लसीकरण मोठ्या प्रमाणावर केलं पाहिजे आणि दोन डोस घेतलेल्यांना हळूहळू बाहेर पडायची परवानगी दिली पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे. त्याबाबत मी शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांच्याशी बोलणार असल्याचं त्यांनी सांगितलं. ' प्रत्येकाची मतं वेगळी आहेत. काही  जणांना वाटतं पुढचे १०० ते १२० दिवस महत्त्वाचे आहेत. त्यामुळं या दिवसांत करोना नियमांचं काटेकोर पालन व्हायला हवं. अनेक ठिकाणी लोक विनामास्क फिरताना दिसतात. अशी बेफिकिरी योग्य नाही,' असं ते म्हणाले. 

'केंद्र सरकारकडून लोकसंख्येच्या प्रमाणात कोविड लस मिळायला हवी. मात्र, तसं होताना दिसत नाही. लस उपलब्ध होत नसल्यानं लसीकरणाचा वेग मंदावला आहे. केंद्राने जुलैमध्ये लस मिळेल असं सांगितलं होतं. पण अजूनही पुरेशी लस मिळालेली नाही, अशी माहिती अजित पवार यांनी दिली. 'पूर्वी लोक लस घ्यायला घाबरत होते. आता लोक लस घेऊ लागले आहेत. लोकांची मानसिकता बदलली आहे. ही सकारात्मक बाब आहे, असंही ते म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या