Ticker

6/Breaking/ticker-posts

धक्कादायक... एका दिवसात ४००० मृत्यू, महाराष्ट्र आघाडीवर

 *एकाच दिवसात ४२,०१५ रुग्ण दाखल तर ३९९८ जणांचा मृत्यू

*महाराष्ट्रातील सुधारीत आकडेवारीनंतर मृत्यूच्या संख्येत अचानक वाढ

*बुधवारी ३६ हजार ९७७ रुग्णांना रुग्णालयातून सुटी

 






लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 नवी दिल्ली : आज (बुधवारी) सकाळी आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासांत करोनामुळे ३९९८ जणांच्या मृत्यूच्या नोंदीसहीत मृत्यूच्या आकड्यानं अचानक उसळी घेतलीय. याचसोबत देशातील मृतांची एकूण संख्या ४ लाख १८ हजार ४८० वर पोहचलीय. मंगळवारी एकाच दिवसात जवळपास ४००० मृत्यूंची नोंद करण्यात आलीय. कालच्या दिवसात सर्वाधिक ३६५६ मृत्यू महाराष्ट्रात नोंदवण्यात आले आहेत.

 

आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, कालच्या दिवसात सर्वाधिक ३६५६ मृत्यू महाराष्ट्रात नोंदवण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील सुधारीत महाराष्ट्रातील एकूण मृत्यूंची संख्या १ लाख ३० हजार ७५३ वर पोहचलीय. करोना मृत्यूच्या बाबतीत महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर आहे. काल जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीत तब्बल १२५ दिवसांतील करोनाच्या सर्वात कमी रुग्णांची अर्थात ३० हजार ०९३ रुग्णांची नोंद करण्यात आली होती. मात्र, मंगळवारी (२० जुलै २०२१) ४२ हजार ०१५ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. याचसोबत देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या ३ कोटी १२ लाख १६ हजार ३३७ वर पोहचलीय. देशात सध्या ४ लाख ०७ हजार १७० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

बुधवारी ३६ हजार ९७७ रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आलीय. त्यामुळे करोनावर मात करणाऱ्या रुग्णांची एकूण संख्या ३ कोटी ०३ लाख ९० हजार ६८७ वर पोहचलीय. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, दैनिक पॉझिटिव्हिटी रेट २.२७ टक्क्यांवर आहे. सलग २३० व्या दिवशी दैनिक पॉझिटिव्हिटी रेट ३ टक्क्यांच्या खाली आहे.

 

एकूण बरे झालेली रुग्णसंख्या : ३ कोटी ०३ लाख ९० हजार ६८७

उपचार सुरू : ४ लाख ०७ हजार १७०

एकूण मृत्यू : ४ लाख १८ हजार ४८०

करोना लसीचे डोस दिले गेले : ४१ कोटी ५४ लाख ७२ हजार ४५५

 

लसीकरण मोहीम

देशात सुरु असलेल्या लसीकरण मोहिमेदरम्यान आतापर्यंत एकूण ४१ कोटी ५४ लाख ७२ हजार ४५५ लसीचे डोस देण्यात आले आहेत. यातील ३४ लाख २५ हजार ४४६ लसीचे डोस मंगळवारी एका दिवसात देण्यात आले.

भारतात पार पडलेल्या चाचण्या

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं ICMR दिलेल्या माहितीनुसार, २० जुलै २०२१ पर्यंत देशात एकूण ४४ कोटी ९१ लाख ९३ हजार २७३ नमुन्यांची चाचणी करण्यात आलीय. यातील १८ लाख ५२ हजार १४० नमुन्यांची करोना चाचणी कालच्या एकाच दिवसात करण्यात आली.

 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या