*इलेक्ट्रिक गाड्यांना प्रोत्साहन व प्राधान्य देणार.
*प्रमुख शहरांत सरकारी व
खासगी चार्जिंग सुविधा.
लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
पुणे: राज्यातील वाढते प्रदुषण आणि त्यामुळे निर्माण होणारे संभाव्य धोके टाळण्यासाठी महाराष्ट्र सरकार इलेक्ट्रिक
गाड्यांना प्रोत्साहन व प्राधान्य देणार असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
फिटवेल मोबिलिटी प्रायव्हेट लिमिटेडच्या महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा या राज्यांसाठीच्या इलेक्ट्रिक थ्री-व्हिलर गाड्यांच्या वितरण सेवेचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पिंपरी-चिंचवड येथे झाले. त्यावेळी ते बोलत होते. राज्यातलं वाढतं प्रदूषण आणि त्यामुळे निर्माण होणारे संभाव्य धोके लक्षात घेता सरकारने नवीन इलेक्ट्रिक वाहन धोरण जाहीर केले आहे. या धोरणानुसार राज्यात इलेक्ट्रिक वाहन खरेदीला प्रोत्साहन देण्यात येणार आहे. इलेक्ट्रिक वाहन खरेदीला प्राधान्य मिळावे यासाठी राज्यातील प्रमुख शहरांमध्ये सरकारी व खासगी चार्जिंग सुविधा उभारण्यात येणार आहेत. पेट्रोल, डिझेलचे वाढणारे दर त्यामुळे होणारे प्रदूषण आणि ग्लोबल वॉर्मिंग या सर्व समस्येवर इलेक्ट्रिक वाहने हाच पर्यावरणपूरक असा चांगला पर्याय असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी सांगितले.
0 टिप्पण्या