लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
अहमदनगर : गेले काही दिवसांपासून जबरी चोर्या,घरफोड्याबरोबरच
ना ना विविध क्लूप्त्या लढवून चारचाकी गाड्या पळविण्याच्या घटनेत मोठी वाढ झाली आहे
. अशीच घटना आज पहाटेच्या सुमारास नगरमध्ये घडली , नगरमधून चालकाला बेदम मारहाण करून हुडाईची असेंट कार पळवून नेली. फिर्याद
दाखल होताच कोतवाली पोलिसांनी तपासची सूत्रे
जलदगतीने फिरवीत कार पळविणार्या टोळीचा छडा लावला. अवघ्या काही तासात ही टोळी मूद्धेमालासह जेरबंद केली.
याबाबत अधिक माहिती अशी की, आज दि .२१/०८/२०२५ रोजी पहाटे ०२.३० वाचे
सुमारास फिर्यादी चिन बालाजी लेंडवे (वय -२४ वर्षे धंदा चालक रा . चक्रपाणी वसाहत
. दुर्गामाता कॉलनी भोसरी जि पुणे) हे त्यांचे हुडाई कारमध्ये पुणे येथुन भाडे
घेवुन अहमदनगर शहरात आले असता त्यांनी गाडीतील प्रवासी यांना अहमदनगर येथ सोडुन
पुन्हा पुणे येथे जात असतांना नगर शहरातील नगर -पुणे रोडवरील कायनेटीक चौकात
रोडच्या कडेला त्यांची कार उभी करुन बाजुस विश्रांती घेत असतांना तीन अनोळखी इसम वय अंदाजे २४ ते २५
वर्षे हे सुझुकी अक्स मोपेड मोटार मायकलवर आले . त्यांनी लेंडवेच्या कारचा दरवाजा वाजवुन ‘ तु
कार येथे का उभी केलीस’ येथे पार्कीग नाही असे म्हणुन त्यास लाथाबुक्यांनी मारहाण केली.व त्यांच्या फिर्यादीचे विशातील ४,००० / -रु रोख रक्कम व २,००,०००
/ - किंमतीची हुंदाई कंपनीची असेंट कार (नं एमएच १४ एफ सी ३ ९ ५४) ही बळजबरीने
घेवुन गेले. फिर्यादीवरुन कोतवालीत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे .
गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक राकेश मानगांवकर यांनी तात्काळ
तपासाची चक्र फिरवुन तपासाबाबत आदेश दिले. पोलीस अंमलदार हे केडगांव भागात
आरोपींचा शोध घेत असतांना पोलीस निरीक्षक राकेश मानगांवकर यांना गुप्त
बातमीदारमार्फत गुन्हयातील आरोपी हे केडगाव परीसरात आले आहे. अशी बातमी मिळाल्याने
त्यांनी गुन्हे शोध पथकाचे पोसई मनोज कचरे यांना तसे आदेश दिल्याने मिळालेल्या
गुप्त बातमीनुसार गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार यांनी गुन्हयातील सशंयित ३ आरोपीना
मोठ्या शिताफिने तात्काळ जेरबंद केले. त्यांनी प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली ,परंतु पोलिसी खाक्या दाखवताच
पोपटासारखे बोलू लागले . त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली आहे . त्यांचे
ताव्यात गुन्हयातील मिळालेला मुददेमाल २,००,००० / -रु किंमतीची हुंदाई अॅसेंट कार नं एमएच १४ एफ सी ३ ९ ५४ ही जप्त केली.
सदरची कारवाई पोलीस
अधिक्षक मनोज पाटील ,.अपर
पोलीस अधिक्षक सौरभ कुमार अग्रवाल , उपविभागीय पोलीस अधिकारी
विशाल ढुमे . यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राकेश मानगांकर , पोसई मनोज कचरे , पोसई मनोज महाजन , पोहेकॉ दिपक साबळे , पोना योगेश भिंगारदिवे ,
पोना गणेश धोत्रे , पोना नितीन शिंदे ,
पोना सागर पालवे , पोना नितीन गाडगे , पोना शाहीद शेख , पोना बंडु भागवत , पोकॉ सुजय हिवाळे , पोका तान्हाजी पवार , पोकॉ सुमित गवळी , पोकॉ कैलास शिरसाठ , पोकॉ प्रमोद लहारे , पोकॉ सोमनाथ राऊत , पोकॉ सुशील वाघेला , पोका भारत इंगळे यांनी केली. या
कामगिरीबद्धल पोलिसांचे अभिनंदन होत आहे.
1 टिप्पण्या
सर्व पोलिसांची नाव छापली पण आरोपीचे नाव आपल्या वाचकांना नाही सांगितले..
उत्तर द्याहटवा