लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
या बैठकीत मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे
आणि मुंबई शहर पालकमंत्री अस्लम शेख यांनी देखील सूचना केल्या.
मुख्यमंत्र्यांनी
कोणत्या महत्त्वपूर्ण सूचना दिल्या?
*दरडी कोसळू शकतात अशा ठिकाणी पालिकेचे लक्ष असले
तरी अनपेक्षित दुर्घटना घडणार नाही याची काळजी घ्या. आज चेंबूर, विक्रोळी येथील दुर्घटनेत संरक्षक
भिंतीच्या वरून मागील टेकडीचा भाग घरांवर पडल्याने मोठ्या प्रमाणावर मलबा पसरून
प्राणहानी झाली ही गोष्ट लक्षात घेण्याची गरज आहे. गेल्या वर्षी देखील मलबार हिल
येथे टेकडीचा भाग अचानक खचला होता.
*उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्यांच्या टॉवर्सखाली
मोठ्या प्रमाणावर वस्त्या आहेत, त्याबाबतही वीज कंपन्यांना तातडीने सांगून सजग राहण्यास सांगावे.
*काही ठिकाणी भूमिगत वाहनतळामध्ये पाणी घुसले व
वाहनांचे नुकसान झाले आहे, तसेच
भांडूप येथे जल शुद्धीकरण केंद्रच बंद पडल्याची घटना घडली आहे हे पाहता अधिक
सावधगिरी बाळगावी
* पावसाचा जोर रात्री वाढतो आहे हे ९ जून आणि आत्ता
काल झालेल्या पावसाने लक्षात आले आहे हे पाहता रात्री देखील पाणी उपसा करणारी
यंत्रणा, कर्मचारी काम करीत
राहतील हे पाहावे.
* पाऊस थांबल्यानंतर मोडकळीस आलेल्या इमारती अधिक
कमकुवत होऊन त्यांचा काही भाग पडून मोठी दुर्घटना घडते. मोडकळीस आलेल्या इमारती मग
त्या पालिका किंवा म्हाडाच्या अखत्यारीतील असोत, खूप धोकादायक इमारतीतील रहिवाशांना कोणत्याही परिस्थितीत
बाहेर काढून त्यांना स्थलांतरित करा.
* सर्वच यंत्रणांनी बचाव पथके तयार ठेवावीत व
आपापल्या नियंत्रण कक्षांना एकमेकांशी सातत्याने संपर्कात राहण्यास सांगावे. कोविड
केंद्र व फिल्ड रुग्णालयांतील डॉक्टर्स व वैद्यकीय पथकांना देखील मदतीसाठी तयार
ठेवावे.
*अर्धवट बांधकामे, मेट्रोची व इतर कामे यामधून भरपूर पाऊस झाल्यास पाणी साचून
दुर्घटना होऊ नये तसेच त्यानंतरही त्या ठिकाणी पाणी साचलेले राहून मलेरिया,
डेंग्यू, लेप्टो सारखे रोग पसरवू नये म्हणून
विशेष काळजी घ्यावी व पाण्याचा निचरा लगेच होईल हे पाहावे.
'फिव्हर क्लिनिक्स सुरु करा'
यावेळी बोलताना पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी
परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्याची आवश्यकता आहे असे सांगून महत्त्वपूर्ण सूचना
केल्या. पालकमंत्री अस्लम शेख यांनी देखील पुढील तीन दिवस
महत्त्वाचे असून मुंबईचा पाणीपुरवठा सुरळीतपणे सुरु राहील याची काळजी घ्यावी व
पर्यायी व्यवस्था करावी,असे सांगितले. वीज वाहिन्या व त्यांचे खांब सुस्थितीत राहतील आणि त्यातून
विजेचा धक्का लागणार नाही याविषयी कंपन्यांना खबरदारी घेण्यास सांगावे, असंही ते म्हणाले.
पालिकेचे
अधिकारी-कर्मचारी २४ तास ड्युटीवर
मुंबईतील जोरदार पावसाबाबत माहिती देताना
महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल म्हणाले की, काल रात्रीपासून पहाटेपर्यंत जोरदार पाऊस कोसळून अवघ्या
काही तासांमध्ये २०० मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. या पावसात
वाशीनाका परिसरातील वंजारतांडा येथे संरक्षक भिंत कोसळली. तसेच विक्रोळीतील पंचशील
चाळीवर दरडीचा भाग कोसळला. या दोन प्रमुख दुर्घटनांसह अन्य एक घटना मिळून एकूण २७
नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू ओढवला आहे. या दुर्घटनांच्या स्थळी बचाव आणि
मदतकार्य तातडीने करण्यात आले आहे. पालकमंत्री आदित्य ठाकरे आणि अतिरिक्त
महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्यासह भेटी देवून यंत्रणांना आवश्यक ते
निर्देश दिल्याचंही चहल यांनी नमूद केले.
उपनगरीय रेल्वे रुळांवर साचणाऱया पावसाच्या पाण्याच्या
अनुषंगाने इकबाल सिंह चहल म्हणाले की, माहूल येथील पर्जन्य जल उदंचन केंद्राचे बांधकाम लवकरच सुरु होणार असून
हे केंद्र पूर्ण झाल्यानंतर कुर्ला, शीव, चुनाभट्टी इत्यादी परिसरातील पाणी साचण्याचा प्रश्न निकाली निघेल.
मुंबईत पावसामुळे होणाऱया भूस्खलन घटना पाहता, संभाव्य
ठिकाणांवर महानगरपालिका प्रशासनाचे बारीक लक्ष आहे. अशा ठिकाणांवरील नागरिकांचे स्थलांतर
व पुनर्वसन करण्याबाबतची कार्यवाही देखील करण्यात येत आहे, असेही आयुक्तांनी नमूद केले.
0 टिप्पण्या