लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
आजपासून
राजधानी दिल्लीत पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. अधिवेशनादरम्यान
विरोधकांकडून इंधन दरवाढीच्या मुद्द्यावर संसदेत सरकारला घेरण्याची शक्यता आहे. यावर
बोट ठेवत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केंद्र सरकारवर निशाणा
साधला आहे.
पवार यांनी एक ट्वीट केलं आहे.
रोहित पवारांनी केलेल्या ट्वीटमध्ये ते
म्हणतात, महागाईच्या ओणव्यात
आज सामान्य माणूस भाजून निघतोय, पण चक्क दोन दिवसांपासून
पेट्रोल-डिझेलचे दर वाढले नाहीत. कदाचित आजपासून सुरू होणाऱ्या संसद अधिवेशनात
टीकेची तीव्रता कमी व्हावी म्हणून ते स्थिर असावेत. पण काही का असेना. यामुळं
केंद्र सरकारचे मानावे तेवढे आभार कमी आहेत, असं खोचक ट्वीट
त्यांनी केलं आहे.
आजपासून
संसदेचं अधिवेशन
राजधानी दिल्लीत आजपासून संसदेच्या
पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झालीय. विरोधकांकडून शेतकऱ्यांचे प्रश्न, लसीकरण धोरण आणि महागाईच्या मुद्यावर
संसदेत चर्चा करण्याची मागणी करण्यात आलीय. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी दोन्ही
सदनात शेतकरी आंदोलन आणि कृषी कायद्यांचा मुद्दा उपस्थित केला जाणार आहे.
0 टिप्पण्या