*केंद्रीय मंत्रिमंडळ
विस्तारानंतरच्या भाजपमधील नाराजीवर चर्चा सुरूच
*केंद्रीय राज्यमंत्री
रामदास आठवले यांनी केले भाष्य
लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
पुणे: केंद्रीय
मंत्रिमंडळाच्या विस्तारात खासदार प्रीतम मुंडे यांना स्थान न मिळाल्यामुळं पंकजा
मुंडे यांच्या समर्थकांनी पक्षातील पदांचे राजीनामे देऊ केले होते. पंकजा यांनी
समर्थकांची समजूत काढली असली तरी त्यांची स्वत:ची नाराजी लपून राहिलेली नाही.
समर्थकांसमोर केलेल्या भाषणातून ही नाराजी उघड झाली. भाजपच्या नेत्यांनी यावर सावध
प्रतिक्रिया दिली असली तरी भाजपच्या मित्रपक्षाचे नेते रामदास
आठवले यांनी आज या मुद्द्यावर खुलेआम भाष्य करत नव्या चर्चेला तोंड फोडलं आहे.
भाजपमध्ये बहुजनांचं नेतृत्व संपवलं जात
असल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्यानं होत आला आहे. हा आरोप करताना एकनाथ खडसे, विनोद तावडे, चंद्रशेखर
बावनकुळे व पंकजा मुंडे यांची नावं घेतली जातात. विधानसभा निवडणुकीत पराभूत
झालेल्या पंकजा यांना पक्षांना विधान परिषदेवर आमदारकीची संधी नाकारली गेली.
नुकत्याच झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात प्रीतम मुंडे स्थान दिलं जाईल,
अशी अपेक्षा होती. तीही फोल ठरली. त्यामुळं या आरोपांना जोर चढला
आहे.
पुण्यात असलेले केंद्रीय सामाजिक न्याय
राज्यमंत्री रामदास आठवले यांना पत्रकारांनी पंकजा मुंडे यांच्या नाराजीबद्दल
विचारणा केली. त्यावर, पंकजा
मुंडे या यांच्यावर नाराज आहेत, असं
आठवले यांनी सांगून टाकलं. ' पंकजा या गोपीनाथ मुंडेंच्या
तालमीत तयार झाल्या आहेत. त्या भाजपमध्येच
राहतील. त्यांनी पदापेक्षा पक्षासाठी काम
करावं,' असंही आठवलेंनी पुढं सांगितलं.
0 टिप्पण्या