लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
जामखेड
: वंजारवाडी ता जामखेड येथील
योगेश जायभाय हा युवक पहाटे
सहा वाजता उठून शौचालयासाठी घराबाहेर जात असताना घराबाहेर विजेच्या तारा खाली पडलेल्या असताना त्या पाहण्यात न आल्याने युवक ताराला
चिटकला व गंभीर जखमी झाल्याने त्यांना ग्रामीण रुग्णालयास येथे दाखल करण्यात आले परंतु वैद्यकीय अधिकारी यांनी मृत
घोषित केले. याबाबत जामखेड पोलीसात तुकाराम जायभाय यांच्या खबरीने आकस्मात
मृत्यूची नोंद झाली आहे.
काल
दि 16/ रोजी
सकाळी ६ वा सुमारास माझा पुतण्या योगेश बळिराम जायभाय वय 23 वर्ष
रा . वंजारवाडी ता . जामखेड हा नेहमीप्रमाणे उठुन संडासला चालला असता घराजवळील
विद्युत खांबावरिल तार तुटुन खाली पडलेली होती ती त्यास दिसली नसल्याने त्याचा
तारेवर पाय पडल्याने त्याला करंट ( शॉक ) बसला असता तो ओरडा त्यावेळी शेजारी
असलेले नातेवाईक काय झाले म्हणुन पाहण्यासाठी गेले
असता तेथे पडलेल्या तारेस चिकटला होता .
त्यावेळी
त्याचे वडील व भाऊ त्याला ओढण्यासाठी गेले असता त्यांना त्या विद्युत तारेचा करंट
बसला व ते ही तेथे खाली पडले त्यावेळी मी व माझा मुलगा भागवत जायभाय तेथे गेले व
दोरीच्या साहाय्याने त्यांचे अंगावरिल तार ही बाजुला केली त्यावेळी माझा भाऊ
बळिराम हा बेशुध्द पडला होता व दुस - या पुतण्या गोकुळ यांचे हातास भाजले व गोकुळ
याचेवर उपचार चालु दुपारी उशीरा वंजारवाडी येथे मयत योगेश जायभाय याच्यावर
अंत्यसंस्कार करण्यात आले. गुरवार रोजी वंजारवाडी व परिसरात मोठय़ा प्रमाणावर पाऊस
झाला होता यामुळे तेथे ओलावा होता यामुळे व त्यातच विजेच्या तारा पडून योगेशला शॉक
लागून जीव गमवावा लागला आहे. योगेशेच्या अकस्मात निधनाने
वंजारवाडी व पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.
0 टिप्पण्या