*१ लाख ६३ हजारांची हातभट्टी केली उध्वस्त
लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
नगर: नगर तालुक्यातील वाळकी , साकत , खडकी , निमगाव वाघा , नेप्ती या ठिकाणी सुरू असणाऱ्या गावठी दारू अड्डयांवर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या पथकाने मोठी कारवाई केली . दारू भट्टया उध्वस्थ करत लाखों रुपयांची दारू नष्ठ केली . या प्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे .पोलीसांनी केलेल्या कारवाईमुळे हातभट्टीवाल्यांचे धाबे दणाणले आहे .
वाळकी येथील धोंडेवाडी शिवारात असणाऱ्या हातभट्टी अड्डयावर पोलीसांनी छापा टाकत तीन हजार रुपये किंमतीचे दारू तयार करण्याचे कच्चे रसायन उध्वस्थ केले .पोलीसांना पाहताच संतोष दिलीप पवार पळून गेला .पो.कॉ. विक्रांत भालसिंग यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
साकत येथे सीनानदी परिसरात चार ठिकाणी चालू
असलेल्या हातभट्टया उध्वस्थ करत दारू तयार करण्याचे १ लाख ३२ हजार रुपये किंमतीचे
कच्चे रसायन पोलीसांनी नष्ठ केले . या प्रकरणी दत्तु महिपती पवार , सोमनाथ
नारायण पवार , राजु मौला पवार ,अर्जुन
मौला पवार ( सर्व रा . साकत ता. नगर ) गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
खडकी शिवारात सुमन संजय पवारही विनापरवाना
तयार गावठी दारू विकताना पोलीसांना आढळून आली .२००० रुपये किंमतीची २० लिटर गावठी
दारू पोलीसांनी नष्ठ केली . या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे . निमगाव
वाघा येथील पवार वस्ती शिवारात असणारा गावठी दारूचा अड्डा पोलीसांनी उध्वस्थ केला
.२४ हजार रुपये किंमतीचे ४०० लिटर दारू तयार करणाचे कच्चे रसायन नष्ठ करून सचिन
नाथा पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
नेप्ती येथील गावठी दारू अड्डयावर कारवाई करत २००० हजारांची २० लिटर दारू नष्ठ करण्यात आली . या प्रकरणी सुभाष रघुनाथ मोरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी पसार झाला आहे .
तालुका
पोलीसांकडून एकाच वेळी अनेक गावठी दारू अड्डयांवर कारवाई करण्यात आली . यामुळे
हातभट्टी चालक , दारू विक्रेते यांचे धाबे दणाणले आहेत
.पोलीसांकडून झालेल्या कारवाईचे नागरिकांनी कौतुक केले आहे .तालुका पोलीस ठाण्याचे
सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्यासह पथकातील गांगर्डे , सोनवणे , कदम , शिंदे ,लगड , विक्रांत भालसिंग यांनी ही कारवाई केली .
0 टिप्पण्या