*आयसीआयसीआय बँक कर्ज प्रकरणात ईडीची मोठी कारवाई.
*पीएमएलए कायद्यांतर्गत आधीच दाखल आहे एफआयआर.
लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
आयसीआयसीआय
बँकेशी संबंधित कर्ज प्रकरणात व्हिडिओकॉन समूहाचे मालक राजकुमार धूत आणि वेणूगोपाल
धूत हे धूत बंधू ईडीच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. २०१२ मध्ये आयसीआयसीआय
बँकेने धूत यांच्या व्हिडिओकॉन समूहाला ३ हजार २५० कोटी रुपयांचे कर्ज दिले होते.
बँकेच्या तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांची या कर्जपुरवठ्यात
महत्त्वाची भूमिका राहिली होती, असा आरोप आहे. या कर्ज
प्रकरणाच्या बदल्यात व्हिडिओकॉन समूहाने चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांच्या
कंपनीत ६४ कोटी रुपये गुंतवले होते. ही रक्कम लाच म्हणून देण्यात आली होती,
असाही आरोप आहे. या प्रकरणात चंदा कोचर, व्हिडिओकॉन
समूहाचे प्रमुख वेणूगोपाल धूत आणि अन्य काही जणांविरुद्ध पीएमएलए कायद्यांतर्गत
एफआयआरही दाखल झालेला आहे. याच प्रकरणात दीपक कोचर यांना अटकही करण्यात आली होती.
0 टिप्पण्या