Ticker

6/Breaking/ticker-posts

सकारात्मक ! करोनाच्या रुग्णसंख्येत मोठी घट ; मृत्यूही कमी..

 *गेल्या २४ तासांत राज्यात ६ हजार ७४० नवीन रुग्णांचे निदान .

*१३ हजार ०२७ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

* ५१ करोना बाधितंचा मृत्यू झाला.






लोकनेता  न्यूज

(  ऑनलाईन न्यूज नेटवर्क  )

 

मुंबई: राज्याला आज मोठा दिलासा मिळाला असून आजच्या रुग्णसंख्येत मोठी घट पाहायला मिळत आहे. तसेच मृत्यूंच्या संख्येतही मोठी घट झाली आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासात एकूण ६ हजार ७४० नव्या करोना बाधित रुग्णांचे निदान झाले आहे. तर, आज एकूण १३ हजार ०२७ इतके रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तसेच, आज दिवसभरात फक्त ५१ करोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

 

आजच्या ५१ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूबरोबरच राज्यातील मृत्यूदर २.०१ टक्के इतका आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ५८ लाख ६१ हजार ७२० रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.०२ टक्के एवढे झाले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या