Ticker

6/Breaking/ticker-posts

उच्चभ्रू वस्तीत सुरू होतं सेक्स रॅकेट;असा झाला पर्दाफाश..!

 *डोंबिवलीत सेक्स रॅकेट,चार तरुणींची सुटका ;सहा आरोपींना अटक

 






लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

कल्याणः डोंबिवली पूर्वेकडील लॉजिंग अँड बोर्डिंगमध्ये छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. चार तरुणींची सुटका करण्यात आली आहे. तर, लॉजच्या मॅनेजरसह सहा जणांना अटक करण्यात आली आहे.

ठाण्याच्या अँटी ह्यमुन ट्रॅफिक सेलनं ही कारवाई केली आहे. डोंबिवली पूर्वेकडील जिमखाना रोडला सांगली चौकात बालाजी दर्शन इमारत आहे. या इमारतीच्या समोरच साईराज लॉजिंग अँड बोर्डिंग आहे. या लॉजमध्ये असलेल्या सेक्स रॅकेटचालत असल्याची माहिती ठाण्याच्या अँटी ह्युमन ट्रॅफिक सेलला मिळाली होती. त्यानुसार, सोमवारी रात्री या ठिकाणी छापा टाकण्यात आला. यावेळी चार तरुणी वेश्याव्यवसाय करताना आढळून आल्या. त्यानंतर या तरुणींची सुटका करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कित्येक दिवसांपासून या भागात देहव्यापार सुरू होता. पोलिसांनी पहिले बोगस गिऱ्हाईक पाठवून प्रथम खात्री केली. त्यानंतर पोलिसाच्या पथकानं छापेमारी करत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. लॉजचा मॅनेजर, कॅशियर आणि दोन वेटरसह दोन दलालांनाही अटक केली आहे. तर, चार मुलींची सुटका करण्यात आली आहे.


सेक्स रॅकेटच्या विळख्यातून सोडवण्यात आलेल्या चार मुलींना महिला सुधार केंद्रात पाठवण्यात आलं आहे. तर, अटक करण्यात आलेल्या सहा आरोपींवर कलम ३७६ (२), ३७० (२), ३४ अंतर्गंत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डोंबिवली सारख्या सांस्कृतिक शहरात सुरू खुलेआम देहव्यापार सुरू असताना डोंबिवली पोलिसांकडून कारवाई का करण्यात आली नाही, असा सवाल स्थानिकांकडून केला जातोय.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या