Ticker

6/Breaking/ticker-posts

रायगडमध्ये बचावकार्याला वेग ; आतापर्यंत ४४ मृतदेह ढिगाऱ्याखालून काढले बाहेर.

 









लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क

 

महाड: कोकणातील अतिवृष्टीचा मोठा फटका रायगड जिल्ह्याला बसला आहे. जिल्ह्यात महाड व पोलादपूरसह तब्बल सहा ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. पावसानं काहीशी उसंत घेतल्यानंतर आता जिल्ह्यात मदत व बचावकार्याला वेग आला आहे. 

आतापर्यंत दोन ठिकाणी दरडीच्या ढिगाऱ्यांखालून ४४ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी ही माहिती दिली. दरड कोसळून जखमी झालेल्या ३५ जणांवर सध्या उपचार सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं.

 एका ठिकाणी बचावकार्य अजूनही सुरूच असून किमान ५० जण ढिगाऱ्याखाली असण्याची भीती घटनास्थळी उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या