88 लीटर दारु, देशी दारुच्या सीलबंद बाटल्या जप्त
लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
अहमदनगर : तोफखाना
व कोतवाली पोलिसांनी शहरातील विविध भागात गावठी दारु बनविणार्या हातभट्ट्यांवर
छापे मारत 88 लीटर दारु, देशी दारुच्या
सीलबंद बाटल्या जप्त केल्या आहेत. या प्रकरणी तोफखाना पोलिसात चार व कोतवाली पोलिस
ठाण्यात दोन अशा सहा जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
तसेच, ढवणवस्ती येथील एका बंद टपरीच्या आडोशाला छापा मारुन तोफखाना पोलिसांनी चेन्नई मटका चालविणार्या एकावर कारवाई केली आहे. या प्रकरणी जितेश राजू धोत्रे (रा. गुंडू गोडाऊनमागे, तपोवन रोड) याच्या विरोधात पोलिस नाईक प्रदीप बडे यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे
कोतवाली पोलिसांनी साठेवस्ती माळीवाडा परिसरात व कायनेटीक चौक परिसरात छापे मारुन हातभट्टी व देशी दारुच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. याप्रकरणी पोलिस हवालदार सुमित सदाशिव गवळी यांच्या फिर्यादीवरुन हेमंत शिवाजी सुरे (रा. मल्हार चौक, रेल्वे स्टेशनजवळ) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर पोलिस
हवालदार भारत मनोहर इंगळे यांच्या फिर्यादीवरुन बाबासाहेब कोंडीराम वैरागर
(रा.साठे वसाहत, माळीवाडा) याच्या विरोधात गुन्हा दाखल
करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर ,पोलिस
उपनिरीक्षक मनोज कचरे, पोलिस नाईक शाहीद शेख, नितीन शिंदे, गणेश धोत्रे, भारत
इंगळे,प्रमोद लहारे, सुमित गवळी
आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
0 टिप्पण्या