लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
पाथर्डी
: शहरातील नाईक चौक,कोरडगाव चौक आणि अजंठा चौकातील
रस्तावरील फेरीवाले, फळविक्रेते
व इतर विक्रेते यांच्यावर नगरपरीषदेकडुन एकतर्फी अन्यायकारक कारवाईच्या
निषेधार्थ काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पालिकेवर मोर्चा
काढला .
काँग्रेसचे
तालुकाध्यक्ष नासिर शेख,जालिंदर
काटे,जुनेद पठाण,राष्ट्रवादीचे
शहराध्यक्ष योगेश रासने,देवा पवार,अक्रम
आतार यांच्या नेवृत्वाखाली फेरीवाले
व फळ विक्रेत्यांनी पालिकेवर मोर्चा नेऊन प्रशासनाचा निषेध केला. याप्रसंगी रवि
पालवे, दीलावर बागवान,शकील, फारुख, किशोर डांगे,गणेश दिनकर,महेश लगड,अक्रम आतार, अनील
साबळे,दत्ता पाठक, धनराज घोडके ,
सगोवींद पवळे,सलीम पठाण, अलीम पठाण, शाहरुख बागवान,शाहरुख
पिंजारी, केसरबाई शेटे , गोरख म्हस्के,
अफरोज बागवान, शाहरुख फकीर, रमेश भागवत कादर पठाण, माणीक भागवत आदी उपस्थित होते
यावेळी नासिर शेख म्हणाले कि,पालिकेतील सत्ताधारी पदाधिकारी
आणि प्रशासन गोर गरीब कष्टकरी व्यवसायिकांना उद्धवस्त करण्याचा डाव करत
आहे.शहरातील मोठयांची अतिक्रमणे तशीच ठेवायची त्यांच्याशी हितसंबंध सांभाळण्यासाठी गरिबांचा बळी द्यायचा
.शहारत काही झाले कि या रस्तावर फळ व इतर व्यवसाय करणाऱ्या लोकांवर कारवाई करायची,पालिकेतील कर्मचारी या व्यवसाय करणाऱ्या लोकांना हिडीस पीडीसपनाची वागणूक
देत आहे.
गेल्या
सात आठ वर्षांपासून पालिकेने या लोकांवर अन्यायच केला आहे. शहरात थोडे काही बिघडले कि पालकेचे अधिकारी ,पोलीस स्टेशनचे अधिकारी यांनी या
हातगाडीवर व्यवसाय करणाऱ्या लोकांना दमबाजी करून हातगाडी उचलून फेकून देण्याचे
प्रकार घडले आहेत.गरीब फेरीवाले देशद्रोही,गुन्हेगार आहेत का?अशी वागणूक देण्यासाठी.फेरीवाला ,हातगाडीवर फळे विकून
प्रामाणिक अत्यंत सयंमी काम करणाऱ्या लोकांवर अत्याचार केला जात आहे.मोठ्यांच्या
अतिक्रमांसाठी पालिका त्यांना जाब विचार नाही
त्यांच्याशी तुमचे आर्थिक हित संबंध आहे का?गरिबांच्या मागे
लागून त्रास दिला जातो.असा आरोप शेख यांनी केला .
यावेळी
योगेश रासने म्हणाले कि , उदरनिर्वाहाचा
प्रश्न अत्यंत गंभीर झाला असुन सद्याची बिकट परीस्थिती आणि कोरोना काळातील वाढती
बेरोजगारी लक्षात घेता होणारी कारवाई ही सामान्य जनतेवर अन्यायकारक आहे.हातगाडीवर
व्यवसाय करणाऱ्या लोकांना पालिकेने स्वतःच्या मालकीच्या जागेवर कायमची व्यवस्था
करावी अशी मागणी रासाने यांनी केली .
पाथर्डी
शहरामध्ये फेरीवाला झोन (हॉकर्स झोन ) स्थापन न करता राज्य शासनाच्या
व उच्च न्यायालय यांच्या आदेशानुसार पथ विक्रेता समिती स्थापन न
करता फेरीवाला झोन अस्तित्वात न आणता शहरातील गरीब फेरीवाले व विक्रेते यांच्यावर
व्यवसायबंदीची कारवाई पालिका करत आहेत. हि कारवाई एकतर्फी असुन काबाड कष्ट करून
पोट भरणान्यांवर अन्याय करणारी आहे. या सर्वांचे कुटुंब रस्त्यावर आले आहेत. तरी
हि जुलमी कारवाई थांबवून फळ व फेरीवाल्या व्यवसायिकांना पुरवत व्यवसाय करण्याची
परवानगी पालिका प्रशासनाने द्यावी अन्यथा बेमुदत आमरण उपोषण पालिकेच्या कार्यालयासमोर
करण्याचा इशारा या व्यावसायिकांनी दिला आहे.
.
0 टिप्पण्या