लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
पारनेर : राज्यासह जिल्ह्यात करोना संसर्ग आटोक्यात येत असल्याचे
चित्र असताना गेल्या एक महिन्यापासून पारनेर तालुक्यातील रुग्ण संख्या जिल्ह्यात
पहिल्या क्रमांकावर आहे. दररोज साठ ते सत्तर रुग्ण आढळून येत आहेत.जिल्ह्यातील इतर
तालुक्यात रुग्ण संख्या कमी होत असताना पारनेरमध्ये मात्र रुग्ण संख्या स्थिर झाली
आहे.त्यामुळे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी चिंता व्यक्त केली असून पारनेर
तालुक्यात जनुकीय उत्पवर्तन (सिमोन सिक्वेंसिंग) करण्याचे आदेश मुख्यमंत्री उध्दव
ठाकरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्हा आरोग्य यंत्रणेला दिले आहेत.
मुख्यमंत्री ठाकरे यांनी काल राज्यातील नगरसह इतर काही जिल्ह्यातील करोना स्थिती व उपाययोजनांचा आढावा घेतला.यावेळी त्यांनी पारनेर तालुक्यात जिनोम सिक्वेंसिंग करण्याचे आदेश दिले. जिनोम सिक्वेंसिंग या प्रक्रियेत तालुक्यातील रुग्णांमध्ये आढळणाऱ्या विषाणूंच्या जनुकीय संरचनेत बदल होऊन नवीन 'म्युटेशन' तयार झाले आहे का याबाबत संशोधन होणार आहे.नवीन म्युटेशन आले असेल तर या म्युटेशनवर सध्याच्या लसी उपयुक्त आहेत किंवा नाही याची तपासणी करण्यात येईल.संशोधनात अश्या प्रकारचा जनुकीय संरचनेत बदल झालेला विषाणू आढळल्यास त्याचा इतरत्र फैलाव रोखण्यासाठी उपाययोजना करणे सोयीचे होणार आहे.
विषाणूंच्या जनुकीय संरचनेत बदल झाला आहे का नाही. हे जिनोम सिक्वेंसिंग केल्यानंतर ओळखता येतं. यामुळे विषाणूचा संसर्ग कुठे आणि कसा पसरतोय याची माहिती मिळण्यास मदत होते.जनुकीय संरचनेत बदल झालेल्या विषाणूवर उपलब्ध असलेली लस प्रभावी आहे का हे शोधण्यासाठी मदत होते.नविन 'स्ट्रेन' मनुष्याला संसर्ग करू शकतो किंवा नाही याबद्दल संशोधन करता येते. नवीन विषाणू ओळखण्यासाठी 'जिमोन सिक्वेंसिंग' चा उपयोग होतो.असे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांचे मत आहे.
0 टिप्पण्या