Ticker

6/Breaking/ticker-posts

गुंतवणुकदारांचे अखेर...गुंतवणुकीसाठी रिअल इस्टेटलाच प्राधान्य

 







लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

मुंबई : मागीलवर्षी करोना संकटातही महामुंबईतील रिअल इस्टेट क्षेत्राने भरारी घेतली होती. हे चित्र आणखी किमान सहा महिने असेल. गुंतवणुकदार अद्यापही रिअल इस्टेटमध्येच गुंतवणुकीला प्राधान्य देत आहेत, असे हाऊसिंग डॉट कॉम व नरेडको यांच्या सर्वेक्षणात समोर आले आहे.

यामध्ये जानेवारी ते जून या कालावधीत सुमारे तीन हजाराहून अधिक ग्राहकांचे सर्वेक्षण करण्यात आले. यातील निष्कर्षानुसार, गुंतवणुकीसाठी रिअल इस्टेटला ४३ टक्क्यांचा सर्वाधिक प्रतिसाद मिळाला. त्यानंतर शेअर बाजारला २० टक्के, मुदत ठेवींसाठी १९ टक्के, तर सोन्यातील गुंतवणुकीसाठी १८ टक्के प्रतिसाद ग्राहकांनी दिला.

' आरोग्याच्या संकटामुळे जगभरातील घराच्या मालकीचे महत्त्व वाढले आहे. त्यातूनच निवासी रिअल इस्टेट क्षेत्राची मागणी वाढली आहे. मोठ्या अपार्टमेंटमध्ये सुधारणा करण्याकडेही ग्राहकांचा कल दिसून येत आहे', असे हाऊसिंग डॉट कॉमचे समूह सीईओ ध्रुव अगरवाला यांचे म्हणणे आहे.

' करोना काळात घराचे महत्त्व, स्वतःच्या घराच्या मालमत्तेचे मूल्य नागरिकांना अधिक कळले. एकात्मिक टाऊनशिपवर भर दिला जात आहे. उत्तुंग भांडवल बाजारपेठ, गृहकर्जावरील गृहकर्जावरील व्याजदर व मुद्रांकशुल्कांतील घट यांमुळे घरांची मागणी वाढती आहे.', असे नरेकडो नॅशनलचे अध्यक्ष डॉ. निरांजन हिरानंदानी यांनी सांगितले.

' गेल्यावर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत एप्रिल ते जून २०२०दरम्यान मागणी व पुरवठा या दोन्हींमध्ये वाढ झाली. करोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये गृहनिर्माण बाजारपेठेत चांगलीच लवचिकता दिसून आली आहे. सर्वेक्षणानुसार जूनपासून खरेदीदारांच्या भावना सुधारल्या आहेत. सणांच्या हंगामात मागणी चांगली असेल', असे हाऊसिंग डॉट कॉमचे समूह सीओओ मणि रंगराजन यांचे म्हणणे आहे.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या