Ticker

6/Breaking/ticker-posts

‘मोबाईल टॉवर उशाला.. पण रेंज मात्र काशिला... !’ ग्रामस्थांबरोबरच ऑनलाइन विद्यार्थ्यांसमोर अडचणींचा डोंगर..

 


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 नगर:  नगर तालुक्यातील रतडगाव शिवारात गावात जीओ सह बीएसएनएलचे टॉवर आहे पण रेंज मात्र एकालाही नाही. नेटवर्क गावात नाही तर दुसऱ्या गावात येत आहे. त्यामुळे मोबाईल टॉवर उशाला.. पण रेंज मात्र काशिला... !अशी गत असूय टॉवर उभारणीसाठी रतडगाव ग्रामपंचयतने परवानगी दिली तेव्हा नेटवर्क सोडू असे जिओची अधिकारी यांनी सांगितले होते . मात्र अजूनही गावात नेटवर्क येत नसल्याने ग्रामस्थांबरोबरच  ऑनलाइन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कित्येक अडचणीला सामोरे जावे लागतंय. बाबत दखल घ्यावी, व नेटवर्क पुर्ववत करावे, अन्यथा तीव्र आंदोलन करावे लागेल असा इशारा देण्यात आला आहे

 गावात जीओ सह बीएसएनएलचे टॉवर आहे . पण त्याच टॉवरच नेटवर्क वीजे वर आधारित आहे . वीज गेली की नेटवर्क जातो . तसेच पाऊस झाला तर दोन किंवा तीन दिवस कधी कधी तर आठ आठ दिवस येत नाही . त्यामुळे गावातील काही बऱ्या- वाईट घटनांची माहिती सोशल मिडीयामधून नेटवर्क नसल्याने ग्रामस्थांना माहिती होत नाही.  जिओ कंपनीने टॉवर सुरू केलं तर आगडगाव, देवगाव, रतडगाव गावचा नेटवर्कचा तिढा सुटेल. त्यामुळे या मागणीची टॉवर कंपनीने दखल घेऊन टॉवर लवकरात लवकर चालू करावं . अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे .     

 याबाबत रतडगावचे सरपंच स्वर्गीय तुकाराम वाघुले व देवगावचे मा.सरपंच विठ्ठल वामन यांनी जिओ अधिकारी यांच्याशी वारंवार पत्र व्यवहार केले . त्यावेळी १५ दिवसात चालु करून देऊ असे आश्वासन दिले . पण अजून त्यांचे १५ दिवस झालेच नाही . देवगाव,रतडगाव या गावमधी दुसरा कोणता ही टॉवर नसून नेटवर्क मिळत नाही . त्यामुळे ऑनलाइन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कित्येक अडचणीला सामोरे जावे लागतंय . आता सरकारने शिक्षकांना ऑनलाइन क्लास घेण्यास सांगितलं तर रतडगाव देवगाव या गावात नेटवर्क अभावी विद्यार्थी शिक्षण घेतील कसे ? असा प्रश्न निर्माण झाला असून सरकारने या बाबत दखल घ्यावी, व नेटवर्क पुर्ववत करावे, अन्यथा तीव्र आंदोलन करावे लागेल असा इशारा देण्यात आला आहे.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या