लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
नाशिक : करोनाने ओढावलेल्या लॉकडाउनमधून कसेबसे सावरणाऱ्या शेतकऱ्यांपुढे आता दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. त्यातच गेल्याकाही दिवसांपासून जपलेल्या आणि नुकत्याच बाजारात दाखल झालेल्या टोमॅटो पिकास अवघा पाचे रुपये प्रति किलो असा भाव मिळत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
कांद्यापाठोपाठ टोमॅटो, मिरचीसह भाजीपाला उत्पादनात अग्रेसर
असलेला नाशिक जिल्हा गेल्या
वर्षभरापासून विविध समस्यांना तोंड देत आहे. लॉकडाउन असल्याने बाजार समिती बंद होत्या.
त्यामुळे शेतमालाचे खूप नुकसान झाले. गेल्या काही दिवसांपासून बाजार सुरळीत झाले
आहेत. शेतकऱ्यांना दिलासा मिळत असतानाच पावसाने पाठ फिरवली आहे.
त्यामुळे शेतकरी
दुबार पेरणीच्या फेऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. त्यातच हाताशी आलेल्या मिरची, टोमॅटोला बाजाराम कमी भाव मिळत आहे. निर्यातक्षम टोमॅटो चार
रुपयांपासून सहा रुपयांपर्यंत विकला जात आहे. लाल व गारशेल टोमॅटो पाच रुपये किलो
व प्रति क्रेट १०० ते १२० रुपयांने विकला जात आहे.
0 टिप्पण्या