Ticker

6/Breaking/ticker-posts

पावसाचं रौद्ररूप ! चिपळूण शहर पाण्याखाली

*चिपळूणमध्ये २००५ ची पुनरावृत्ती

*चिपळूण-मुंबई मार्ग वाहतुकीसाठी बंद








लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 रत्नागिरी : राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे रत्नागिरीमध्ये नद्यांना पूर आला आहे. अनेक गावांमध्ये पाणी शिरल्यामुळे घरं, दुकानं आणि गाड्या पूर्ण पाण्याखाली गेल्या आहेत. चिपळूण शहरात अनेक ठिकाणी पुराचे पाणी भरल्याने 2005 ची पुनरावृत्ती झाल्याची स्थिती आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चिपळूण-कराड मार्गे चिपळूण-मुंबई मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

राजापूर परिसरात पावसाने धुमाकूळ घातला आहे. मुसळधार पावसामुळे काजळी नदी धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे राजापूर नगरपरिषदने भोंगा वाजवून नागरिकांना याबाबत इशारा दिला आहे. काजळी नदी धोक्याची पातळी ओलांडून वाहू लागल्याने नदीजवळील सर्व व्यावसायिकांना सुरक्षित जागी राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

कोकणात जगबुडी नदीने रौद्र रूप धारण केल्याने यंदा खेड शहर बाजरपेठ येथे पुराचे पाणी घुसले आहे. त्यामुळे भीतीचे वातावरण आहे. २१ जुलै रोजी बुधवारी मध्यरात्री नंतर हे पाणी बजारपेठ परिसरात शिरले आहे. २२ जुलै रोजी गुरूवारी सकाळी ६ वा.पर्यंत ही पूरस्थिती कायम आहे. व्यापाऱ्यांनी आपला माल सुरक्षित स्थळी हलवण्यास मध्यरात्री पासून सुरवात केली. मात्र, तरीही मोठ्या प्रामाणात पाणी वाढल्याने मोठे नुकसान होण्याची भीती आहे.

दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून नदीकाठी असलेल्या भोस्ते पुल परिसरातील व तळ्याचा खांब येथील काही नागरिकांना प्रशासनाकडून सुरक्षित स्थळी शाळेत व अंगणवाडी येथे हलवण्यात आले आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या