लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
खर्डा: जामखेड तालुक्यातील खर्डा येथील ग्रामदैवत कानिफनाथ
टेकडी परिसरात महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री नामदार धनंजय मुंडे
यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले.
पर्यावरणाचा
लहरीपणा मुळे अनियमित आणि कमी प्रमाणात पडणारे पर्जन्य,जास्त
प्रमाणात होत चाललेले वृक्षतोड यामुळे कडक उष्णता या सर्वांवर उपाय म्हणून जामखेड
तालुका राष्ट्रवादी ग्रंथालय सेल तालुका अध्यक्ष तुळशीदास गोपालघरे यांनी नामदार
धनंजय मुंढे याच्या वाढदिवसानिमित्ताने खर्डा
ग्रामदैवत कानिफनाथ टेकडी परिसरात वृक्षारोपण करून साजरा करण्यात आले.
यावेळी वेलनेस परिवारातील सदस्य जामखेड तालुका राष्ट्रवादी ग्रंथालय
सेलचे तालुकाध्यक्ष तुळशीदास गोपाळघरे,सेवा सोसायटीचे चेअरमन
चंद्रकांत गोलेकर,दत्ता गोपाळघरे,ग्रा.पं
सदस्य महालिंग कोरे, मिलन कांकरिया,प्रा.अमोल
जायभाय, प्रगतशील शेतकरी दयानंद इंगवले,प्रा विशाल सौन,प्रा हनुमंत कोरे,प्रा.आदिनाथ खेडकर,डॉ अशोक सोनटके,वैभव आंधळकर,वसंत पवार आदि सदस्य उपस्थित होते.
0 टिप्पण्या