लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
शेवगाव शहरातील साईनगरमध्ये स्व कांताभाऊ फडके चँरीटेबल ट्रस्टच्या वतीने शहरातील नागरीकांसाठी अँटिबाँडीज तपासणी अभियान व रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमामध्ये आमदार राजळे बोलत होत्या. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे, नगरसेवक सागर फडके, गणेश कोरडे, कमलेश गांधी, दिगंबर काथवटे, नितीन दहिवाळकर, अर्जुन ढाकणे, टिंकूशेठ बंब, नितीन मालानी, मछिंद्र बर्वे, किरण पूरनाळे, कैलास सोनवणे, लालाशेठ धूत, संतोष कणगंणकर आदी प्रमुख उपस्थित होते. या शिबीरामध्ये ७० जणांची अँटिबाँडीज तापसणी करण्यात आली. तर ७५ जणांनी रक्तदान केले. या कार्यक्रमासाठी अर्पण ब्लड बँक, नगर, डाँ. फडके हाँस्पिटल व प्रसुतीगृह शेवगाव, श्री.साई मंदिर समिती, साम्राज्य ग्रुप व सागर फडके मित्र मंडळने परिश्रम घेतले.
0 टिप्पण्या