लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
चंद्रभागेत
स्नानाला मनाई, चंद्रभागा झाली बंदिस्त
सध्याच्या करोना संकटामुळे यंदाची आषाढी मर्यादित
स्वरुपात साजरी होत असल्याने बाहेरच्या कोणत्याही भाविकाला पंढरपुरात प्रवेश
दिलेला नाही. मात्र आषाढी एकादशी दिवशी पंढरपूरमधील भाविकांनीही चंद्रभागेत
स्नानाला जाऊ नये, यासाठी
चंद्रभागेचे सर्व घाट लोखंडी बॅरेगेंटिंग लावून बंद करण्यात आल्याने आता चंद्रभागा
बंदिस्त झाली आहे. चंद्रभागेत प्रवेश करणारे सर्व घाट आणि मार्गांवर लोखंडी
बॅरेगेंटिंग लावून मोठा पोलिस बंदोबस्त या घाटांवर ठेवण्यात आला आहे. यामुळे
शासनाने परवानगी दिलेल्या १० मानाच्या पालखी सोहळ्यातील ४०० वारकऱ्यांनाच केवळ
चंद्रभागेत पादुका स्नानासाठी सोडले जाणार आहे. आषाढी एकादशीला या सर्व पादुकांना
चंद्रभागेच्या पात्रता स्नान घालण्याची परंपरा आहे. तेवढ्याच वारकऱ्यांना
चंद्रभागेपर्यंत जाता येणार आहे.
विठुरायाच्या
जयघोषात दुमदुमून निघणाऱ्या पंढरीत यंदा मात्र शुकशुकाट दिसत आहे.
द्रभागेच्या
काठावरती 65 एकरमध्ये
दिंड्यांना उतरवण्यासाठी जी जागा आरक्षित केली आहे तिथे या वेळी पाय ठेवायलाही
जागा शिल्लक राहिली नसती. पण आज मात्र हा काठ सुनसान आहे
0 टिप्पण्या