Ticker

6/Breaking/ticker-posts

दादा लय भारी..! ; आ.रोहितदादांची वारी.. थेट पुरग्रस्तांच्या दारी.."

 


     लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

साकत :पुरग्रस्तांच्या मदतीसाठी  वेगवेगळ्या प्रकारच्या  वस्तु घेऊन थेट नागरीकांच्या दारी धावून जाणारे आमचे दादा आहेत. आमचे   " दादा आहेत  लय भारी " आशी चर्चा जामखेडच्या ग्रामीण भागात दिसुन येत आहे.

अतिवृष्टीमुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रावर कोसळलेल्या आपत्तीत संकटग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी नेहमीप्रमाणे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार हे धावून आले आहेत. 'कर्जत-जामखेड' मतदारसंघातील नागरिक आणि 'बारामती ऍग्रो' कंपनीच्या माध्यमातून पुरग्रस्तांसाठी आवश्यक दिड लाख वस्तू घेऊन ते पूरग्रस्त भागात दाखल झाले आहेत. 



कोरोनाच्या संकटकाळीही संपूर्ण राज्यात कोविड योध्यांसाठी आणि नागरिकांसाठी आमदार रोहित पवार यांनी हजारो लिटर सॅनिटाईझर, मास्क, ऑक्सिजन काँसेंट्रेटर, गॉगल, धान्य, भाजीपाला, इतर वैद्यकीय उपकरणे, औषधे आदी वेगवेगळ्या प्रकारची मोठ्या प्रमाणात मदत केली. यामुळे नागरिकांना आणि कोरोना योध्यांना मोठा दिलासा मिळाला. कोणत्याही संकटात मदतीसाठी ते नेहमीच धावून जात असतात.

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील गेल्या काही दिवसांपासून कोसळणाऱ्या अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण झाली. या पुरग्रस्तांसाठीही त्यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. पुराच्या पाण्यामुळे संसार उध्वस्त झालेल्या नागरिकांना तातडीची मदत म्हणून चादर, बिस्कीट, सॅनिटरी नॅपकिन्स, पाण्याच्या बॉटल, ORS एनर्जी ड्रिंक, क्लोरीन पावडर, मास्क, मॅगी नूडल्स, माचीस आदी वस्तूंचा समावेश असलेले दिड लाखाहून अधिक साहित्य त्यांनी पोहोच केले. या साहित्याचे गरजू नागरिकांना न्याय्य वाटप व्हावे यासाठी ते संबंधित ठिकाणचे तहसीलदार, प्रांत, जिल्हाधिकारी किंवा पालकमंत्री यांच्याकडे सुपूर्द केले.

या संकटात शासकीय यंत्रणा, सामाजिक संस्था यांच्यासह असंख्य सामाजिक कार्यकर्ते हेही झोकून देऊन अहोरात्र मदतकार्य करत आहेत. काम करताना या सर्वांची ऊर्जा टिकून रहावी याकरिता या सर्व 'फ्रंटलाईन वर्कर'साठी ORS एनर्जी ड्रिंकचे पॅकेटही उपलब्ध करून दिले आहेत. याशिवाय मदत व बचावकार्य करत असताना काही अपघात झाल्यास प्रथमोपचार करण्यासाठी प्रथमोपचार पेट्यांचाही या मदत साहित्यात समावेश करण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या