लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
चंद्रपूरः जिल्ह्यातील सावली तालुक्यातील व्याहड या गावात आपल्या घराबाहेर
झोपलेल्या एक महिलेवर बिबट्याने हल्ला करून ठार केल्याची धक्कादायक घटना समोर आली
आहे. सदर घटना मंगळवारी रात्री १० वाजता घडली. गंगुबाई रामदास गेडाम (६१) असे मृतक
महिलेचे नाव आहे.
चंद्रपूर वनविभागाच्या सावली वन परिक्षेत्रातील
सामदा नियत क्षेत्रात व्याहड हे गाव येते.जंगलालगतच्या या गावात गंगुबाई गेडाम ही
महिला झोपली होती. त्यावेळी अचानक बिबट्याने तिच्यावर हल्ला करीत तिच्या नरडीचा
घोट घेतला.
घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी
वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी पोहचले. मृतक महिलेचे शवविच्छेदन सावली येथील
ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले. मृतकाच्या नातेवाईकांना तातडीची २५ हजार रुपयांची
मदत देण्यात आल्याची माहिती वनविभागाच्या सूत्रांनी दिली. या घटनेनंतर परिसरात
वनविभागाने गस्त वाढविली आहे.
0 टिप्पण्या