लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
रायगडः महाड येथील तळीये गावावर दरड कोसळून नागरिकांचे संसार उघड्यावर
पडले आहेत. आज केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी तळीये गावाची पाहणी केली त्यावेळी केंद्र सरकार व
राज्य सरकार वसाहत बांधतील असं अश्वासन दिलं आहे. त्याचबरोबर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर मिश्किल टिप्पणीही केली आहे.
नारायण राणे यांनी आज सकाळी देवेंद्र फडणवीस व
प्रवीण दरेकर यांच्यासोबत तळीये गावचा पाहणी दौरा केला. त्यावेळी प्रसारमाध्यमांनी
त्यांना राज्य सरकारसोबत तुमचं काही बोलणं झालं का?, असा सवाल केला. त्यावर नारायण राणेंनी खोचक टिप्पणी
केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्षरित्या टोला लगावला आहे.
गुरुवारी तळीये गावातील
३२ घरांवर दरड कोसळून तेथील कुटुंबे मातीखाली गाडली गेली. येथील सुमारे ४२ कुटुंब
उद्ध्वस्त झाली आहेत. त्यांना पंतप्रधान आवास योजनेतून घरे बांधून देण्यात येणार
आहे, अशी घोषणा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी यावेळी केली आहे.
नारायण राणे हे आज कोकण दौऱ्यावर असून त्यांनी
महाडयेथील तळीये गावातील दुर्घटनाग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी
दुर्घटनाग्रस्तांचे पुनर्वसन करण्यात येईल. राज्य व केंद्र सरकार या ठिकाणी पुन्हा
चांगल्याप्रकारे वसाहत बांधतील, असा शब्द राणेंनी दिला आहे.
' या घटना घडल्यानंतर
दुर्घटनाग्रस्तांना केंद्र आणि राज्य सरकारकडून मदत दिली जात आहे. त्या पलीकडे मदत
होणार नाही असं नाहीये. दुर्घटनाग्रस्तांना पंतप्रधान आवास योजनेंतर्गंत पक्की घरं
देण्याची योजना आहे, असं आश्वासन नारायण राणेंनी दिलं
आहे. तसंच, एकच गोष्ट आम्हाला परत आणता येणार नाही ते
म्हणजे मृत पावलेल्या लोकांना. पण जी लोक आहेत त्यांना मात्र आम्ही दिलासा देऊ
शकतो, याची आम्हाला खात्री आहे,' असं म्हणत दुर्घटनाग्रस्तांना राणेंनी धीर देण्याचा प्रयत्न केला आहे.
' स्थानिकांना मदत
मिळावी यासाठी अधिकारी, एनडीआरएफची पथकं चांगले काम करत
आहेत. गावातील सरपंचांसोबत माझं बोलणं झालं आहे. आमचं गावातच कायमच पुनर्वसन करावं,
अशी त्यांची मागणी आहे. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांना
ग्रामस्थांचे तात्पुरते पुनर्वसन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत आणि स्थानिक
नागरिक सुचवतील त्या ठिकाणी त्यांचं कायमच पुनर्वसन होईल. त्यांना सर्व नागरी
सुविधा मिळणार,' असंही राणेंनी म्हटलं आहे.
' पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांना नुकसानीचं स्वरुप दिलं जाईल. दिल्लीला गेल्यानंतर मी स्वतः
त्यांना अहवाल देईन आणि निश्चितच कोकणवासियांना मदत दिली जाईल,' असा विश्वास नारायण राणेंनी व्यक्त केला आहे.
0 टिप्पण्या