तो नेता म्हणजे देशमुख तर नव्हेत ? चर्चा
लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
सध्या राष्ट्रवादी
काँग्रेसचे नेते तथा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर ईडीची कारवाई सुरू आहे.
ईडीने नुकतीच त्यांची 400 कोटिंची सम्पत्ती जप्त केली असुन आता पुढे कोणती कारवाई होणार
याकडे नजरा लागल्या असतानाच पाटील यांचे हे
सुचक विधान आले आहे. त्यामुळे पाटील
यांचा रोख राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या रोखाने तर नाही ना ? अशी जोरदार चर्चा होत आहे .असल्याचे
मानले जात आहे.
वैद्यनाथ कारखान्यावरील
कारवाईशी नाराजीचा संबंध नाही.
भाजपची
संघटनात्मक बैठक व पक्षकार्याचा आढावा घेण्यासाठी पाटील यांचे शुक्रवारी रात्री
उशिरा शहरात आगमन झाले. तेव्हा पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी वेगवेगळ्या
मुद्द्यांवर मतप्रदर्शन केले. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ साखर कारखान्याचे बँक
खाते गोठविण्यात आल्याबद्दल त्यांना विचारणा केली असता, केवळ
मुंडेच नव्हे तर अनियमित कारभार करणाऱ्या राज्यातील ९० टक्के कारखान्यांवर कारवाई
होत असल्याचे पाटील यांनी सांगितले. पंकजाताई नव्हे, तर
त्यांचे कार्यकर्ते नाराज असून, कारखान्याला बजावण्यात आलेली
नोटीस आणि नाराजीचा संबंध नसल्याचा दावाही त्यांनी केला.
0 टिप्पण्या