Ticker

6/Breaking/ticker-posts

शेतकऱ्यांच्या केबल,मोटार चोरीचे गुह्यातील टोळीला नेवासा पोलिसांकडून अटक ..!

 








लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 नेवासा :   नेवासा तालुक्यातील  शेतकऱ्यांच्या केबल व मोटार चोरी करणाऱ्या टोळीला नेवासा पोलिसांनी   अटक केली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की,मागील दोन वर्षापासुन शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रीक मोटार व केबल चोरीबाबत गुन्हे उघडकीस येत नव्हते.परंतु नेवासा पोलिसांनी शेतकऱ्यांच्या मोटार व केबल चोरी करणाऱ्या पाच चोरट्यांना जेरबंद केले आहे. मोटार व चोरी गेल्याबाबत विविध  गुन्हे दाखल होते.पोलिस निरीक्षक विजय करे यांना मिळालेल्या गुप्त बातमीनुसार नेवासा परिसरात केबल व मोटार चोरी करणाऱ्या चोरट्यांना नेवासा पोलिसांना अटक करण्यात यश आले असुन मोटार व केबल चोरी करणारे एकुण पाच आरोपींना अटक केली आहे.

मागील काही वर्षापासुन कुकाणे , भेंडे बुद्रुक , भेंडे खुर्द , तरवडी , देवगाव , जेऊर हैबती , अंतरवाली , वडुले , चिलेखनवाडी , देवसडे आदी गावांतील  शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रीक मोटार व केबल चोरी सातत्याने होत होती . परंतु अनेक जण फिर्यद देण्याच्या नवभानगडीत पडत नसे त्यामुळे गुन्हे उघडकीस येत नव्हते.मात्र पोलीस निरीक्षक विजय करे यांचे नेतृत्वाखाली नेवासा पोलिसांनी शेतकऱ्यांच्या मोटार व केबल चोरी करणाऱ्या पाच चोरट्यांना जेरबंद केले आहे.

त्यात आरोपी 1) मोहन आप्पासाहेब जाधव रा.भेंडा ता.नेवासा 2)करण सिताराम जाधव रा.भेंडा ता.नेवासा 3)गणेश उर्फ सोन्या अशोक गव्हाणे रा.भेंडा ता.नेवासा 4)विष्णु चंदु कडमिंचे रा.रामनगर शेवगाव ता.शेवगाव 5) महेंद्र नामदेव जाधव रा.भेंडा ता.नेवासा यांना अटक केली असुन त्यांचेकडुन नेवासा पोलिस स्टेशनला गुन्ह्यात चोरी गेलेल्या केबल व मोटार असा एकुण 35,000/-रुपये किंमतीच्या इलेकट्रीक मोटार व केबल हस्तगत करण्यात आल्या आहे.  पोनि.विजय करे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसांनी चोरटय़ांना पकडले आहे. 

 दरम्यान ,परिसरातील शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन सीसी टीव्ही कॅमेरे मोटार असणाऱ्या ठिकाणी लावावेत जेणेकरून पोलिसांना तपास करण्यास सोपे जाईल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या