लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
अहमदनगर : नगर-कल्याणरोड
वरील रेल्वे पुलाजवळ गणेश नगर वसाहतीची स्थापना झाली. सर्व गणेश नगर वासियांनी
आमदार संग्राम जगताप यांची भेट घेतली असता त्यांनी तात्काळ गणेश नगर मधील अंतर्गत
रस्त्यांच्या डांबरीकरण व मजबुतीकरण कामासाठी 32 लाख
रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे आता गणेश नगरच्या रस्त्यांचा प्रश्न
मार्गी लागला आहे .गणेश नगर मधील विविध नागरी समस्या सोडवण्यासाठी आ.संग्राम जगताप
यांच्या भरीव सहकार्यातून आपण प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते
गणेश शिंदे यांनी केले.
गणेश नगर येथे आ.संग्राम जगताप यांच्या स्थानिक विकास निधीतून रस्ता डांबरीकरण व मजबुतीकरण कामाचा शुभारंभ पै.वैभव वाघ यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी सामाजिक कार्यकर्ते गणेश शिंदे,संतोष लांडे,सागर शिंदे,सनी शिंदे,अनिल राऊत,किसन जगंम, महेश रसाळ,उमेश गोरे, गणेश मचिकटला,विशाल माने,रुपेश लोखडे,संजय वागस्कर,पोपट शेळके आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना वैभव वाघ म्हणाले की,कल्याण
रोड परिसरामध्ये नागरी वसाहती झपाट्याने वाढत आहे या वसाहतींमधील नागरिकांना
मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे यासाठी आ.संग्राम जगताप यांच्या
माध्यमातून विविध विकास कामे सुरू आहेत गणेश नगर परिसरातील अंतर्गत रस्त्यांचा
प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे यासाठी आ. संग्राम जगताप यांनी मोठा निधी उपलब्ध
करून दिला आहे. दिवाळीपर्यंत या भागातील रस्त्यांची कामे मार्गी लागून रस्त्यांचा
प्रश्न सुटणार आहे,पुढील काळामध्ये उर्वरित प्रश्न मार्गी
लागण्यासाठी आ. संग्राम जगताप यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला जाईल असे
ते म्हणाले.
0 टिप्पण्या