लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
दत्तनगर भागात राहत असलेल्या संतोष कर्डिले यांचे घर उसाच्या शेताजवळ असल्याचा फायदा घेवून सहा ते सात अज्ञात चोरट्यांनी तार कंपाउंड व तेथील कडीकोंडा तोडून प्रवेश केला.तीन चोरटे घरात घुसले. तर अन्य चोरटे अंगणात उभे होते. त्यांच्या हातात कोयता,लोंखडी गज व कमरेला तलवारी होत्या. शस्राचा धाक दाखवून चोरट्यांनी अंदाजे साडेतीन तोळे सोन्याचे दागिने चोरुन नेले.लहान मुले व महिलांच्या कान व नाकातील दागिने छोट्या कटरने तोडून पायातील चांदीचे जोडवेही नेले. येथून शेजारीच राहत असलेल्या गायकवाड यांच्या घरी चोरटे गेले मात्र तेथे काहीच हाताला लागले नाही.
शेजारच्या
दिपक जाधव यांच्या गच्चीवरील दरवाजा तोडून चोरट्यांनी कपाटातील तीन तोळे दागिने व
तीन हजार रुपये चोरुन नेले.चोरट्यांनी जवळच्या सर्व घरांच्या बाहेरुन कड्या
लावल्या होत्या. रविवारच्या मध्यरात्री दोन ते तीन वाजता तिन्ही घटना झाल्या. आण्णासाहेब
दरंदले यांची खिडकी तोडून चोरीचा प्रयत्न झाला मात्र सर्व उठल्यानंतर चोरटे पळाले.
दरंदले यांनी लगेच पोलिसांना खबर दिली.पोलिस वाहन तीन वाजता आले तोपर्यंत चोरटे
पळून जाण्यात यशस्वी झाले.सहायक पोलिस निरीक्षक रामचंद्र कर्पे यांनी घटनास्थळी
भेट देवून पाहणी केली.दरम्यान ,चोरीची फिर्याद देण्यासाठी कर्डिले व जाधव सोमवारी सायंकाळी साडेचार वाजता
पोलिस ठाण्यात आले.
मात्र
तब्बल साडेतीन तास उलटूनही फिर्याद दाखल झाली नव्हती. त्यामुळे संताप व्यक्त करण्यात
येत आहे.
0 टिप्पण्या