*राज कुंद्राला अश्लील
व्हिडिओ बनवल्याप्रकरणी अटक
*राजसोबत आणखीही कलाकारांनी
केलं आहे या इंडस्ट्रीमध्ये अस काम
*अश्लील व्हिडिओंमध्ये काम करून त्यांनी कमावले कोट्यवधी रुपये
लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क
मुंबई- प्रसिद्ध उद्योजक आणि अभिनेत्री
शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्राला सोमवारी रात्री मुंबई पोलिसांनी अटक केली. अश्लील
व्हिडिओ तयार करणे आणि प्रदर्शित करणे या गुन्ह्याबद्दल राजला अटक करण्यात आली
आहे. राजच्या अटकेनंतर दिवसेंदिवस निरनिराळे खुलासे होत आहेत. राजच्या लीक
झालेल्या व्हॉट्सअप चॅटमधून अश्लील व्हिडिओ बनवून राज दिवसाला लाखोंची तर
महिन्याला कोट्यवधींची कमाई करत असल्याचा खुलासा झाला होता. परंतु, राज काही पहिली व्यक्ती नाहीए
ज्याचं नाव या इंडस्ट्रीसोबत जोडलं गेलं. यापूर्वीही काही कलाकारांनी अश्लील
व्हिडिओंमध्ये काम करून कोट्यवधींची कमाई केली आहे. परंतु, त्यांच्याबद्दल
फारसं कुणाला माहीत नाही. काहींनी त्यांचं काम प्रेक्षकांपासून लपवून ठेवलं तर
काहींनी नाव बदलून काम केलं.
सनी लिओनी
बॉलिवूड
अभिनेत्री सनी लिओनी अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी पॉर्न इंडस्ट्रीमध्ये
काम करत होती. यातून सनीने कोट्यवधी रुपये कमावले आहेत. त्यानंतर तिने तिचा मोर्चा
बॉलिवूडकडे वळवला. सनीने आपल्या अभिनयाने बॉलिवूड प्रेक्षकांनाही आपलंस केलं.
मिया मल्कोवा
बॉलिवूडचे लोकप्रिय दिग्दर्शक राम गोपाल वर्मा
यांच्या 'गॉड, सेक्स अँड ट्रूथ' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये
पदार्पण करणारी अभिनेत्री मिया मल्कोवादेखील यापूर्वी अश्लील व्हिडिओंमध्ये काम
करत होती.
सिलवेस्टर
स्टॅलोन
हॉलिवूडचे लोकप्रिय अभिनेते सिलवेस्टर स्टॅलोन देखील
चित्रपटात काम करण्यापूर्वी पॉर्न व्हिडिओमध्ये काम करत असत. सिलवेस्टर
हॉलिवूडमध्ये 'रॅम्बो'
म्हणून लोकप्रिय आहेत. तर बॉलिवूडमध्येही सिलवेस्टर यांनी 'कमबख्त इश्क' या चित्रपटात करिना कपूरसोबत अभिनय
केला आहे.
जॅकी चॅन
हाँगकाँगमधील लोकप्रिय कलाकार जॅकी चॅन यांनीदेखील
त्यांच्या अभिनय क्षेत्रातील करिअरच्या सुरुवातीला अश्लील व्हिडिओंमध्ये काम केलं
आहे. याचा खुलासा खुद्द जॅकी यांनी एका मुलाखतीत केला होता. जॅकी बॉलिवूड
प्रेक्षकांमध्येही प्रचंड लोकप्रिय आहेत.
0 टिप्पण्या