Ticker

6/Breaking/ticker-posts

कार उडाली आकाशी!; 'फ्लाईंग कार'ची यशस्वी चाचणी

 






लोकनेता  न्यूज

(  ऑनलाईन न्यूज नेटवर्क  )

 ब्रातिस्‍लावा: वाहतूक कोंडीला कंटाळून अनेकदा कारने विमानासारखे हवेत उडावे अशी अनेकांची इच्छा असते. अनेकांच्या मनातील ही इच्छा लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे. रस्तावर चालण्यासोबत हवेत उडण्याची क्षमता असलेल्या कारने यशस्वी उड्डाण केले. एका शहरातून दुसऱ्या शहरात या हवाई कारने यशस्वी प्रवास केला.

ही कार एअरकार नावाच्या कंपनीने तयार केली आहे. या कारने २८ जून रोजी स्‍लोवाकियातील आंतरराष्ट्रीय विमानतळ नित्रा आणि ब्रातिस्लावा दरम्यान प्रवास केला. या दोन ठिकाणच्या विमानतळापर्यंतचे अंतर गाठण्यासाठी या हवाई कारला ३५ मिनिटांचा कालावधी लागला. ही कार अवघ्या तीन मिनिटांमध्ये उड्डाण घेण्यास तयार होते. या कारमध्ये १६० हार्स पॉवरचे बीएमडब्लू इंजिन लावण्यात आले आहे.

एकदा इंधन भरल्यानंतर ही कार ८२०० फूट उंचावरून जवळपास १००० किमी पर्यंतचा प्रवास करू शकते. यामध्ये एक कायमस्वरुपी प्रोपेलर आणि पॅराशूट लावण्यात आले आहे. ही कार हवेत १७० किमी प्रतितास या वेगाने हवेत उडू शकते. या कारचा हवेतील वेग ३०० किमी प्रतितास इतका वाढवण्याबाबत कंपनीचा विचार सुरू आहे. या कारने आतापर्यंत ४० तासांचे उड्डाण केले आहे. आपल्या उड्डाणा दरम्यान कारने ४५ अंश सेल्सिअस कोनात स्वत: ला वळवले. ही कार उड्डाण घेण्यासाठी दोन मिनिट आणि १५ सेंकद इतका कालावधी घेते. इतकाच वेळ कारचे रुपांतर विमानात होण्यासाठी लागतो.

या हवाई कारची चाचणी यशस्वी झाल्याने आगामी काही वर्षात दोन शहरांमधील प्रवासाचे स्वरुप बदलण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी आणि आपात्कालीन स्थितीत अतिशय जलदपणे इच्छित स्थळ गाठता येऊ शकते.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या